Tuesday, 6 May 2025
  • Download App
    SIT चौकशी झाली, तर फडणवीसांनाच जेलमध्ये टाकावे लागेल; मनोज जरांगेंची उर्मट भाषा आजही कायम!!If there is an SIT inquiry, Fadnavis himself will have to be jailed

    SIT चौकशी झाली, तर फडणवीसांनाच जेलमध्ये टाकावे लागेल; मनोज जरांगेंची उर्मट भाषा आजही कायम!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनोज जरांगेंच्या आंदोलनातील मास्टरमाईंड शोधण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशीची घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना उर्मट भाषाच वापरली. SIT चौकशी झाली, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच तुरुंगात टाकावे लागेल, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. If there is an SIT inquiry, Fadnavis himself will have to be jailed

    मनोज जरांगे त्यांची उर्मट भाषा, महाराष्ट्र बेचिराख करण्याची धमकी, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मंत्री यांच्याविरुद्धच्या धमक्या या पार्श्वभूमीवर त्यांच्या सगळ्या आंदोलनाची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले. ते शिंदे – फडणवीस सरकारने स्वीकारले. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावेळी देखील त्यांची भाषा उर्मटच राहिली.

    *सरकारने जाहीर केल्याप्रमाणे SIT चौकशीमध्ये जर माझे सगळे खरे निघाले, तर
    SIT ला मात्र, देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकावे लागेल. पण यंत्रणा घटनेला आणि कायद्याला धरून वापरा, तुम्ही नि:ष्पक्षपातीपणे लढा. पण, मी खरा असेन, तर ज्याने SIT चौकशी लावली त्यालाच जेलमध्ये टाकावे लागेल. कारण मला माहिती आहे. मी पळपुटा नाही. SIT चौकशीत मी सगळे सांगतो. पाहिजे तर हाताचं सलाईन बाजूला काढून चौकशीला सामोरा येतो, अशी आक्रस्ताळी भाषा मनोज जरांगे यांनी वापरली.

    मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आई माई वरून शिव्या देत उर्मट भाषेत कडवी टीका केली होती. तसेच महाराष्ट्राला बेचिराख करण्यापासून वाचवले, असे शब्द वापरले होते. यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूचे आमदार आक्रमक झाले. यावेळी जरांगेंच्या विधानांमागचा मास्टरमाईंड कोण आहे?? याची SIT चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी, तर विधानपरिषदेत प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या चौकशीला पाठिंबा दिला.

    शेलार म्हणाले, महाराष्ट्र बेचिराख करण्याचे कोणी ठरवले?? ही केवळ धमकी आहे का?? या मागची भूमिका काय?? यामध्ये संशय आहे का?? यात कोणी कट-कारस्थाने केली आहेत का?? असे अनेक सवाल यावेळी शेलार यांनी उपस्थित केले तसेच कोर्टानेही तुम्ही गांभीर्याने घ्या. त्यामुळे शांत बसू नका, अशी विनंती शेलारांनी अध्यक्षांकडे केली. जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठा समाजाची बदनामी होत असल्याचेही ते म्हणाले.

    If there is an SIT inquiry, Fadnavis himself will have to be jailed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस