अशांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला तुरुंगात पाठवा, अशाही सूचना केल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवत असते, अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही, त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा कठोर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.If there is a problem in the implementation of the schemes it will be tolerated Chief Minister Shinde
शासनाने जाहीर केल्या सात महत्वाकांक्षी योजनांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. विभागीय आयुक्त, संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हास्तरीय विविध यंत्रणांचे अधिकारी व्हीसीद्वारे तर ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मुख्य सचिवांसह विविध विभांगांचे सचिव उपस्थित होते.
योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्या. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी यासाठी दक्ष राहिले पाहिजे. योजनांच्या अंमलबजावणीचे उद्दिष्ट साध्य करताना लाभार्थ्यांची नोंदणी करताना काही घटक गैरप्रकार करत असतील, ते वेळीच रोखले पाहिजे. विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कुणी महिला भगिनींकडून अर्जासाठी पैशांची मागणी केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करा.
अशांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला तुरुंगात पाठवा. या योजनेत भगिनींना कुणीही नाडता कामा नये याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. या नोंदणीचा सातत्याने आढावा घेतला जाणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या अशा या सर्वच योजनांमध्ये केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील अशा सूचना देण्यात याव्यात. अधिकृत अशा केंद्रावरच अर्ज भरले जातील, असे प्रय़त्न केले जावेत. खासगीरित्या आणि अन्य कुठल्यापद्धतीने कुणी अर्ज भरत असतील, त्यांना वेळीच रोखण्यात यावे, अशा सूचनाही या बैठकीतून देण्यात आल्या.
If there is a problem in the implementation of the schemes it will be tolerated Chief Minister Shinde
महत्वाच्या बातम्या
- पूजा खेडकरच्या वडिलांचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल; जमीन वादप्रकरणी पोलिसांचा शोध; पत्नी मनोरमा यांना काल लॉजमधून अटक
- मि. जरांगे, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नॅरेटिव्हची नाही; जरांगेंनी केलेल्या शिविगाळीला प्रसाद लाडांचे उत्तर!!
- जम्मू-काश्मिरात 3 जागी एन्काउंटर, कुपवाड्यात 2 अतिरेकी ठार; दहशतवाद्यांचा अस्थायी कॅम्पवर हल्ला, 2 जवान जखमी
- ‘पाच दिवसांत बॉम्बने उडवून देईन’ एलएलबीच्या विद्यार्थ्याने प्रसिद्धीसाठी सीएम योगींना दिली धमकी