• Download App
    राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा इशारा |If the state government is uncapable, now we will call for rebellion, warning BJP leader Chitra Wagh

    राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वर्धा जिल्ह्यातील आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्या आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असे त्यांनी म्हटले आहे.If the state government is uncapable, now we will call for rebellion, warning BJP leader Chitra Wagh

    चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झालाय. चिमुकल्या जीवांशी खेळण्याची ३०-३० हजारात सौदेबाजी चालली आहे. कायदे कमजोर नाहीत. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय.



    राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड.या घटनेची माहिती सांगताना चित्रा वाघ म्हणाल्या, अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना वर्धा मधील आर्वी येथे घडली. १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्याच्यात ती गर्भवती राहिली आणि आरोपीच तिला गर्भपातासाठी घेऊन गेला.

    ३० हजारात व्यवहार झाला अशी बातमी ११ जानेवारी रोजी समजली. आर्वी पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि धक्का बसला की, काही कवट्या, हाडं, गर्भपिशव्या त्या ठिकाणी सापडल्या. याचा अर्थ मोठा गोरखधंदा तिथे सुरू होता. किती अवैध गर्भपात तिथे केले गेले? किती मुलांना मारलं गेलं?

    किती चिमुकल्यांची हत्या केली गेली? हे सांगता येणार नाही. सांगलीच्या म्हैसाळची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याचं वाटत आहे. मला आठवतंय की सांगलीच्या म्हैसाळमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. या सगळ्या प्रकरणाचं मूळ जर पाहिलं तर ते कुठे ना कुठे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे जातंय.

    कारण, या १३ वर्षाच्या मुलीवरती लैगिंक अत्याचार करण्यात आला होता. माझ्याकडे अशा प्रकारे अत्याचार झालेल्या आणि त्यांनी बाळाला जन्म दिलेल्या अनेक मुलींची यादी आहे. यामुळेच कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.

    मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती नक्कीच गृहविभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रित येऊन एखादी योजना बनवली पाहिजे. कायदे हे कधीच कमकुवत नसतात परंतु त्याची अमलबजावणी करणारे मात्र कमकुवत झाल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणून या हरामखोरांना सोडता कामा नये.

    राज्यात २५ हजार महिला गायब झाल्याची धक्कादायक माहिती गृहमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्यातील कित्येक जणींसोबत असा प्रकार झाला असेल, याची भीती आता वाटते आहे. त्यामुळेच याची गंभीर दखल घेणं तितकच गरजेचे असल्याचेही वाघ म्हणाल्या.

    If the state government is uncapable, now we will call for rebellion, warning BJP leader Chitra Wagh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस