प्रतिनिधी
सातारा : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला खोचक सवाल केला आहे.If the state government is indifferent then how will Sambhaji Raje’s movement succeed
मराठा समाजाच्या मागणीबद्दल राज्य सरकारचा उदासीन असेल तर संभाजीराजांच्या आंदोलनाला यश कसे मिळेल? असा तो खोचक सवाल आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजे म्हणाले, मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. तसेच दर दहा वर्षांनी जातिनिहाय जनगणना करून आरक्षण फक्त गरीब गरजू व्यक्तींना देण्यात यावे, हे मत मी फार पूर्वी व्यक्त केले आहे. मराठा समाजासाठी राज्य सरकारने काढलेल्या सारथी संस्थेचे नेमके स्टेटस काय आहे? संस्थेकडे निधी किती आहे? तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ मंडळाकडे निधी किती आहे? यविषयीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी यापूर्वीच केली होती.
परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोपही खासदार उदयनराजे भोसले यांनी केला संभाजीराजे यांनी उपोषण मागे घ्यावे आणि तब्येतीला जपावे असे आवाहनही त्यांनी केले.
If the state government is indifferent then how will Sambhaji Raje’s movement succeed
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात हाच माझा शुद्ध हेतू : छत्रपती संभाजी राजे
- उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिव ज्योति अर्पणम महोत्सव; क्षिप्रा नदीचा किनारा २१ लाख दिव्यांनी उजळणार
- शर्मीला ठाकरे म्हणतात, १५ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली वाजवली म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर
- गाढ झोपून हा युवक मिळवितो लाखो रुपये, यू ट्यूबची कमाल
- Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट