विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात एका दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन ज्या दिवशी लागेल त्याच दिवशी पुन्हा तातडीने ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन लावण्यात येईल असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला.
टास्क फोर्सच्या सूचनेनूसार तिसऱ्या लाटेत ३८०० मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनजी गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत एका दिवसाला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन ज्यादिवशी लागेल, तेव्हा राज्यात तातडीने लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल, असा निर्णय झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.If state will need 700 metric tons of oxygen in one day, lockdown will empse autometically, Health Minister Rajesh Tope informed
टोपे यांनी सांगितले की, राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. त्याचबरोबर मॉल्सही उघडणार आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स 15 ऑगस्टपासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू असणार आहे.
शॉपिंग मॉल्सला रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्समध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल, असे सांगून राजेश टोपे म्हणले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जी कोरोनाबाधितांची सर्वोच्च आकडेवारी होती, त्याच्या दीडपटीने व्यवस्था करा, अशी सूचना टास्क फोर्सकडून करण्यात आली आहे.
खुल्या प्रांगणात लग्न सोहळ्याला 200 जणांना उपस्थित राहता येणार आहे. हॉलमध्ये क्षमतेच्या 50 टक्के तसेच जास्तीतजास्त 100 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र सर्व कर्मचाºयांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले हवेत. या सर्व नियमांची अंमलबजावणी ही 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.
सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र त्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांचे दोन डोस झालेले असावेत. कार्यालयात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाºयांना प्रथम लसीकरण देण्याची परवानगी देण्यात आली आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.
If state will need 700 metric tons of oxygen in one day, lockdown will empse autometically, Health Minister Rajesh Tope informed
महत्त्वाच्या बातम्या
- खडसेंची चौकशी करणाऱ्या ईडीने म्हटले -एकनाथ खडसे यांची 2016 मध्ये एमआयडीसीसोबत बैठक झाली, पण त्यांना अजेंडा माहिती नव्हता!
- मराठा आरक्षण : १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकात खा. संभाजी छत्रपतींकडून दोन सुधारणा प्रस्तावित, म्हणाले- ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठी हे गरजेचे !
- अब्जाधीशांनाही कोरोनाचा फटका, देशात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांची संख्या घटली, अर्थमंत्र्यांची संसदेत माहिती
- Work From Home : ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुगलने दिला धक्का, पगार कपातीची टांगती तलवार