Thursday, 8 May 2025
  • Download App
    माझ्या अंगावर कोणी आले तर मी त्याला सोडणार नाही, अमृता फडणवीस यांचा नबाब मलिक यांना इशारा|If someone comes on me, I will not let him go, Amrita Fadnavis warns Nawab Malik

    माझ्या अंगावर कोणी आले तर मी त्याला सोडणार नाही, अमृता फडणवीस यांचा नबाब मलिक यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि मी आम्हा दोघांच्या दोन आयडेंटिटी आहेत. मी गायिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्या अंगावर कोणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. मी खºयाचीची साथ सोडत नाही आणि असत्याला साथ देणाºयालाही सोडत नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांनी दिला आहे.If someone comes on me, I will not let him go, Amrita Fadnavis warns Nawab Malik

    पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या इशा फाऊंडेशन या ग्रुपला मी देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन आले आहे. ईशा फाऊंडेशनने त्यांना घेतलं म्हणून आम्ही घेतलं. तेव्हा जयदीप राणाचा पंटरचा काही रेकॉर्ड नव्हता. त्यानंतर आपण लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, असं मनात आलं.



    आम्ही सदगुरू जग्गी वासूदेव यांच्याशी जोडलो गेलो. त्यांच्या ईशा फाऊंडेशनसाठी एक नदी वाचवण्याबाबतचं गाणे तयार केले. या गाण्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले. मीही झाले. देवेंद्र फडणवीसही झाले. त्यानंतर रिव्हर मार्चनेही आमच्यासाठी एक गाणं बनवा, असं त्यांना सांगितलं.

    सचिन गुप्तांनी त्याला होकार दिला. त्यानंतर सचिन गुप्ताने दिग्दर्शनासाठी मदत केली. तर रिव्हर मार्चने गाणं तयार केलं. फुकटात गाणं तयार केलं. त्या गाण्यात कोळी समाज आणि डब्बेवाले आले. ते एक पैसा न घेता आले. मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतले असते.

    फडणवीस म्हणाल्या, आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते. आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे.

    तुम्हाला राजकारण करायचं आणि बिगडे नवाब व्हायचं आहे तर तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील . त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या सूपर बॉसला.

    If someone comes on me, I will not let him go, Amrita Fadnavis warns Nawab Malik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस