प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँड मध्ये भाजप प्रणित सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी आणि शरद पवारांची भूमिका या विषयावरून अनेक जण त्यांना चिमटे काढत आहेत आणि टोले लगावत आहेत.If Sharad was Shadab he’d be called BTeam & be an untouchable for seculars
असाच टोला हैदराबादचे एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांना हाणला आहे. आम्ही कधीही भाजपला पाठिंबा दिला नाही किंवा त्यांचे समर्थन केले नाही, तरी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे सर्व पक्ष आम्हाला भाजपची बी टीम म्हणतात. पण शरद हे शादाब असते, तर त्यांना भाजपची बी टी म्हटले असते का??, शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्यांनी महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा दिलाच होता, याकडे ओवैसी यांनी आपल्या ट्विटमधून लक्ष वेधले आहे.
सर्व सेक्युलर पक्षांनी आम्हाला राजकीय अस्पृश्य ठरवले आहे. शरद हे शादाब असते तर त्यांनाही असेच राजकीय अस्पृश्य ठरवले असते आणि त्यांना भाजपची बी टीम म्हटले असते, असा टोला देखील ओवैसी यांनी सर्व सेक्युलर पक्षांना लगावला आहे.
नागालँड मधला निर्णय महाराष्ट्रातल्या मतदारांना समजावून सांगायला राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडते आहे, असा टोला संजय राऊत यांनी देखील लगावला आहे.
If Sharad was Shadab he’d be called BTeam & be an untouchable for seculars
महत्वाच्या बातम्या
- अदानी समूहाचे आणखी एक मोठे पाऊल, 7300 कोटींचे कर्ज वेळेपूर्वीच फेडले, गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न
- भाजपाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा
- नागालँडमध्ये सत्ताधारी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण शरद पवारांनी सांगितलं, म्हणाले…
- आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही उद्धव ठाकरेंच्या हाताशी राहत नाहीत – नारायण राणेंचं विधान!