• Download App
    संभाजीराजे राष्ट्रवादीतून निवडणूक लढवू शकतात तर शिवसेना अस्पृश्य होती काय?If Sambhaji Raje can contest from NCP then was Shiv Sena untouchable?

    संभाजीराजे राष्ट्रवादीतून निवडणूक लढवू शकतात तर शिवसेना अस्पृश्य होती काय??; खासदार अरविंद सावंतांचा परखड सवाल

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याचा आरोप करणाऱ्या संभाजीराजे यांना शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले आहे संभाजीराजे छत्रपती हे जर राष्ट्रवादी काँग्रेस मधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात तर शिवसेना त्यांना काय अस्पृश्‍य होती का??, असा परखड सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. If Sambhaji Raje can contest from NCP then was Shiv Sena untouchable?

    आज संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर शब्द फिरवल्याचा आरोप केला. त्यांनी सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला. तसेच, ही राज्यसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं देखील स्पष्ट केले. यानंतर संभाजीराजेंच्या दाव्यांवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली असून त्यांनी नामी संधी घालवल्याची भूमिका शिवसेनेने मांडली आहे.

    संभाजीराजे म्हणाले की, मला वाईट वाटत आहे. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी माझा दिलेला शब्द मोडला. स्वराज्य बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे, असे संभाजीराजे म्हणाले.



    “..असं कुठेच समोर आलं नाही”

    संभाजीराजेंच्या दाव्यांनंतर शिवसेनेवर टीका सुरू झाली असतानाच शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार, विचार घेऊन चालते. सुदैवाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे दिलेला शब्द मोडला असे कधीच घडले नाही. या उमेदवारी प्रकरणावरून कुठेच एकदाही अशी बातमी आली नाही की शिवसेना पुरस्कृत उमेदवार उभा करणार आहे, असे ते म्हणाले.

    गेल्या वेळी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा राष्ट्रवादीने त्यांना दोन जागा मिळाव्यात असा आग्रह धरला. उद्धव ठाकरेंनी तेव्हा त्यांच्या आग्रहाला मान दिला. तेव्हा राष्ट्रवादीनं अधिकृत उमेदवार म्हणून दुसरं नाव फौजिया खान यांचं दिलं. त्यांचे दोन उमेदवार तेव्हा राज्यसभेवर गेले. आता आम्हाला दोन सदस्य पाठवण्याची वेळ आली होती. त्यामुळे शिवसेनेचे दोन राज्यसभा खासदार जात असतील, तर ते मूलत: शिवसेनेचे असायला हवेत. हा विचार पक्ष आणि संघटना म्हणून महत्त्वाचा आहे. त्याच दृष्टीने एका कडवट शिवसैनिकाला ही संधी द्यावी असं उद्धव ठाकरेंच्या मनात होते, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

    – तुम्ही ठाम तर आम्ही ठाम

    दरम्यान, संभाजीराजेंचा विषय आला. त्यांच्याबद्दल आदर आहे. त्या आदरापोटी एका शिवसेना कार्यकर्त्यावर अन्याय होईल, पण छत्रपती आपल्यासोबत येतील तर त्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. त्यामुळे उदार मनाने त्यांनी सांगितले की या, तुमचे स्वागत करतो. पण तुम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून गेलं पाहिजे. राज्यसभेत अपक्ष म्हणून गेलात, तर ती आमची संख्या म्हणून नाही धरली जाणार. राजांबद्दल मला आश्चर्य वाटते की त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. मग आम्ही काय अस्पृष्य होतो का? तुम्ही तुमच्या विचारांशी ठाम असाल, तर आम्हीही आमच्या विचारांशी ठाम राहणार”, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

    – संधी न स्वीकारता अव्हेरलीत

    संभाजीराजेंबद्दल आदर ठेवून सांगतो. त्यांनी खरंच एक नामी संधी घालवली. सातारची गादी बघा कशी फिरली. ती राष्ट्रवादीत होती, नंतर भाजपात गेली. पण गादीबद्दलचा आदर कधी कमी झाला नाही. तो तुमच्याबद्दलचाही कधी कमी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सर्वोच्च आहेत. इतके चांगले संबंध असताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना कार्यकर्त्याला डावलून राजांना उमेदवारी देण्याची तयारी दाखवली. पण ती तुम्ही न स्वीकारता अव्हेरली. तुम्ही शिवसेनेत येऊन समाजाचे काम करू शकत नव्हता का? संभाजीराजेंबद्दल आमच्या मनात आदर आहेच. त्यांनी आत्ता घेतलेली भूमिकेचंही आम्ही स्वागत करतो, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

    If Sambhaji Raje can contest from NCP then was Shiv Sena untouchable?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा