• Download App
    ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा महाविकास आघाडीचा दावा, पण भाजप - शिंदे गटातले वाढते प्रवेश काय सांगतात?? If MVA claims victory in maharashtra grampanchayat elections, then why leaders are joining BJP and shinde group

    ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा महाविकास आघाडीचा दावा, पण भाजप – शिंदे गटातले वाढते प्रवेश काय सांगतात??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : 7000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरशी झाल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. भाजप या निवडणुकीत 1 नंबर ठरल्याचा दावा खोटा असून राष्ट्रवादी काँग्रेसच नंबर 1 वर आहे, असा दावा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, अंबादास दानवे आणि संजय राऊत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळे पक्षप्रवेश मात्र भाजप आणि शिंदे गटात होत आहेत जर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला एवढे मोठ्या प्रमाणावर राजकीय यश मिळाले असेल, तर पक्षप्रवेश भाजप आणि शिंदे गटात कसे काय होतात??, ते कसे वाढले?? ते नेमके काय सांगतात??, हे प्रश्न तयार होत आहेत. If MVA claims victory in maharashtra grampanchayat elections, then why leaders are joining BJP and shinde group

    सतीश घाटगे पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश

    माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साखर कारखानदारीतले सतीश घाटगे पाटील हेवीवेट नाव आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जालना जिल्ह्यात पक्ष मजबूत होईल त्याचबरोबर आरोग्य माझे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते हिकमत उडान यांच्यासमोरही मोठ्या आव्हान उभे राहणार आहे त्यामुळे प्रसारमाध्यमांनी सतीश घाटगे पाटलांच्या भाजप प्रवेशाचे वर्णन देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक असे केले आहे.



     भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात

    तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या जामीनावर स्वाक्षरी करणारे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी एका रात्रीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. नागपुरात भाऊसाहेब चौधरीचा शिंदे गटात प्रवेश होताच इकडे जिल्हा शिवसेनाप्रमुख सुनील पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून त्यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. भाऊसाहेब चौधरी यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातल्या शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर गळतीला सुरुवात झाली आहे. भाऊसाहेब चौधरी त्यांच्याकडे नाशिक मधली सगळी शिवसेना बांधण्याची जबाबदारी होती. पण तेच शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाचा तीळपापड झाला आहे. पण प्रत्यक्ष राजकीय कृती मात्र त्यांच्याकडून फारशी कोणती घडलेली नाही. भाऊसाहेब चौधरी गटात पोहोचणार याची कुणकुण लागताच त्यांची ठाकरे गटातून अधिकृत हकालपट्टी करणे आणि नंतर त्यांच्याविरुद्ध आगपाखड करणे एवढेच काम ठाकरे गटातून झाले असे दिसते.

    विजय आघाडीचा तर त्यांच्यात गळती कशी?

    पण ज्या महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचंड यश मिळण्याचा दावा अजितदादा पवार, अंबादास दानवे आणि संजय राऊत यांनी केला आहे, त्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये नेते का टिकत नाहीत?? किंवा नव्याने त्यांच्या पक्षात प्रवेश का होत नाहीत??, या प्रश्नांची उत्तर त्यांना पत्रकारांनी विचारली नाहीत. त्यामुळे त्यांनी उत्तर दिले नाही. पण म्हणून या मूळ प्रश्नाचे महत्त्व कमी होत नाही. किंबहुना या प्रश्नाच्या उत्तरातच ग्रामपंचायत निवडणुकीत खरे जिंकले कोण आणि त्याचे परिणाम काय होणार याचे “राजकीय रहस्य” दडले आहे. जिथे राजकीय भवितव्याची आणि निवडणुकीत यश मिळण्याची खात्री असते तिकडेच राजकीय नेत्यांची पावले वळतात आणि जर शिंदे गट आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश होत असतील तर ते महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याचे सूचक मानले पाहिजे.

    If MVA claims victory in maharashtra grampanchayat elections, then why leaders are joining BJP and shinde group

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!