Sunday, 4 May 2025
  • Download App
    परत येणारा तर व्हिडिओ टाकून येतो का??; देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांनाच टोला!! If it comes back, does it drop the video?

    परत येणारा तर व्हिडिओ टाकून येतो का??; देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांनाच टोला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “मी पुन्हा येईन” हा जुना व्हिडिओ भाजपच्या अधिकृत हँडल वरून व्हायरल झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली. मराठी माध्यमांनी परस्पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन, अजित पवारांचा पत्ता कापून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनणार असल्याच्या बातम्या दिल्या, पण माध्यमांच्या उतावळेपणाला स्वतः फडणवीसांनीच टोला हाणला आहे. ज्याला परत यायचेय, तो असे व्हिडिओ टाकून येतो का??, असा खोचक सवाल फडणवीसांनी माध्यम प्रतिनिधींना करून त्यांचेच वाभाडे काढले. If it comes back, does it drop the video?

    “मी पुन्हा येईन”, हा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून सकाळी व्हायरल झाल्यानंतर मराठी माध्यमांनी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याच्या बातम्या रंगविल्या. पण त्या दिवसभर चालण्याऐवजी तास – दोन तास चालून नंतर थंडावल्या. कारण 11.00 नंतर शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. त्यामुळे मराठी माध्यमांनी स्वाभाविकपणे पवारांच्या पत्रकार परिषदेवर लक्ष केंद्रित केले.

    पण दरम्यानच्या काळात फडणवीसंच्या त्या जुन्या व्हिडिओने महाराष्ट्रात बरीच राजकीय राळ उडविली होती. अखेर त्यावर स्वतः फडणवीसांनी पुढे येऊन खुलासा केला. ज्याला यायचे तो असे व्हिडिओ टाकून परत येतो का??, असा खोचक सवाल करून फडणवीस यांनी माध्यमांचे वाभाडे काढले.

    या व्हिडिओचे ज्यांना विश्लेषण करायचे ते करू द्या. पण मला आश्चर्य वाटते की एवढा मोठा बदल जर होणार असेल तर असे व्हिडिओ टाकून कोणी करतो का?? मी पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखालीच २०२४ च्या विधानसभा निवडणुका लढविल्या जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपली सर्व मुदत पूर्ण करतील. त्यांच्या मुदतीत एकही दिवसाची कमी होणार नाही. आम्ही सर्वजण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. पण “मी पुन्हा येईन”, या व्हिडिओवरून त्यांनी माध्यमांची पुरती काढून टाकली.

    If it comes back, does it drop the video?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा