आगामी १५ दिवसांत मेळावा घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार
विशेष प्रतिनिधी
चिपळूण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी रत्नागिरीतील चिपळूणमध्ये पदाधिकाऱ्यांना बैठकीत मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीवरही आपली भूमिका स्पष्ट केली. If I have to compromise I will sit at home Raj Thackerays statement in office bearers meeting in Chiplun
राज ठाकरे म्हणाले, ‘’राज्यात जो राजकीय व्याभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही.’’ याचबरोबर, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर येत्या १५ दिवसांत मेळावा घेऊन भाष्य करणार असल्याचंही सांगितलं आहे. तसेच, नाका तिथे शाखा ही मोहीम राबवण्याचे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
याशिवाय, हव्यासापोटी राजकारण अस्थिर… अस्थिरतेमुळे उद्योगविश्वात अविश्वास… विद्वेषामुळे समाज अस्वस्थ… अत्याचारामुळे महिला असुरक्षित… बेरोजगारीमुळे तरुणाई खचलेली… महागाईमुळे कुटुंब त्रस्त… प्रश्नांचा पाढा वाचावा तितका कमीच… महाराष्ट्र चौफेर खदखदतोय पण याच ज्वलंत प्रश्नांवर मतदारराजा मतदान करेल की पुन्हा खोट्या अस्मितेच्या लाटेवर स्वार होईल… तुम्हाला काय वाटतं? असा सवाल मनसेने ट्वीटद्वारे केला आहे.
If I have to compromise I will sit at home Raj Thackerays statement in office bearers meeting in Chiplun
महत्वाच्या बातम्या
- बंगाल पंचायत निवडणुकीचा निकाल : तृणमूल काँग्रेसने जिंकल्या 18,606 ग्रामपंचायतींच्या जागा; भाजपला 4,482; ओवेसींच्या पक्षाला 3 जागा
- बंगळुरूमध्ये एरोनिक्स इंटरनेट कंपनीच्या ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ची तलवारीने वार करू हत्या! माजी कर्मचाऱ्यावर आरोप!
- काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!
- GST Council meeting :ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर आता २८ टक्के जीएसटी;, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त