येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.If help is not given, the farmer will not stay without sitting on your lap, warns Raju Shetty
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीचा पाहण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. मंगळवारी केंद्रीय पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल तर द्या, उगीच त्यांची थट्टा कशाला करताय?, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.तसेच जर मदत दिली नाही तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका देखील राजू शेट्टी यांनी केली आहे.
राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?
“दोन महिन्यांपूर्वी पूर येऊन गेलाय. आता केंद्रीय पथक पुराच्या पाहणीसाठी येत आहे. राजू शेट्टी यांनी हसुर इथल्या महेश पाटील या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. आता पथक पाहणीसाठी येतंय. पण पाहणी केल्यानंतर इथे काहीच नुकसान झालं नाही, असा निष्कर्ष केंद्रीय पथक काढणार आहे , मात्र वास्तविक पाहता 2 लाखांचं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे.
तसंच पेरणीसाठी पुन्हा 30 ते 35 हजार खर्च झाले. हा हिशेब कुणाला सांगायचा, मदत द्यायची असेल तर द्या, चेष्टा कशाला करताय, जर मदत द्यायची नसेल तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान, येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.
If help is not given, the farmer will not stay without sitting on your lap, warns Raju Shetty
महत्त्वाच्या बातम्या
- गोवा क्रूज ड्रग्स रेव्ह पार्टीत बॉलिवुडची मोठी कनेक्शन्स; नार्कोटिक्स ब्युरोचे प्रमुख प्रधान यांचा धक्कादायक खुलासा
- सामंथा अक्कीनेनी- नागा चैतन्यने घेतला घटस्फोटाचा निर्णय
- Shivsena Audio clip: रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद ; नांदेड येथे फडणवीस यांची प्रतिक्रिया
- ‘बघा की…वरनं गडगडाटाचा आवाज येतोय न्हवं का…’