• Download App
    एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर, निष्ठा यात्रा काढली असती का??, अमितचा आदित्यला खोचक सवाल!! If Eknath Shinde had not rebelled, would the Nishta Yatra have been carried out?

    एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर, निष्ठा यात्रा काढली असती का??, अमितचा आदित्यला खोचक सवाल!!

    प्रतिनिधी

    मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ते ठाकरे गटाच्या निष्ठा यात्रेत अधिक ठामपणे शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. पक्षातील नेत्यांशी, सर्वसामान्य लोकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. If Eknath Shinde had not rebelled, would the Nishta Yatra have been carried out?


    Raj – Aditya : चुलत काकाला काटशह जरूर; पण त्या पलिकडे आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा नेमका अर्थ काय…??


    मात्र अशातच त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्यांच्या या दौ-यावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरु केले आहेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचे बंड झाले नसते, तर तुम्ही आजचा महाराष्ट्राचा दौरा करत आहात तसा दौरा केला असता का? एवढाच माझा एक प्रश्न आहे, असे शरसंधान अमित ठाकरे यांनी साधले आहे. आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या या सवालावर अजून प्रत्युत्तर दिलेले नाही पण ते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

    तेजसचे स्वागत

    तेजस ठाकरे सध्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत, त्यामुळे ठाकरे घराण्यातील तेजस ठाकरे राजकारणात येणार अशा चर्चा आहेत. त्यावर अमित ठाकरेंची भाष्य केले आहे. तेजस राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत.

    If Eknath Shinde had not rebelled, would the Nishta Yatra have been carried out?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना