• Download App
    इतर कोणी जर अशी पोस्ट केली असती तर तो आतापर्यंत जेलमध्ये असतात ; कमाल आर खानने उपस्थित केला सवालIf anyone else had posted that, they would still be in jail; Question presented by Kamal R. Khan

    इतर कोणी जर अशी पोस्ट केली असती तर तो आतापर्यंत जेलमध्ये असता ; कमाल आर खानने उपस्थित केला सवाल

    कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य केलं आहे.If anyone else had posted that, they would still be in jail; Question presented by Kamal R. Khan


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केलेल्या कृषी कायद्यांवर कंगनाने भाष्य केलं होतं. पंतप्रधानांच्या निर्णयावर कंगनाने नाराजी दर्शवली होती.या वक्तव्यानंतर तिने आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

    कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये इंदिरा गांधी यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या चपलीखाली डासांप्रमाणे चिरडल्याचं वक्तव्य केलं आहे. कंगनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने संपूर्ण शीख समुदायाला खलिस्तानी म्हंटल आहे.यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तिच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे.

    यावर कमाल आर खान म्हणाले की, आतापर्यंत असा कोणताच कायदा नाही का जो कंगनावर लागू होतो आणि कायदा नाही तर असे कसे? इतर कोणी जर अशी पोस्ट केली असती तर तो आतापर्यंत जेलमध्ये असतात. कायदा सर्वांवर लागू होत नाही का? असे प्रश्न कमाल आर खानने उपस्थित केले आहे.अभिनेता कमाल आर खान याने कंगनाच्या अटकेची मागणी केली आहे.

    If anyone else had posted that, they would still be in jail; Question presented by Kamal R. Khan

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात