• Download App
    मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे ; पोलिसांच्या नोटीशीनंतरही सोमय्या अमरावती दौऱ्यावर ठामI want to meet the people of Amravati; Somaiya insists on Amravati tour even after police notice

    मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे ; पोलिसांच्या नोटीशीनंतरही सोमय्या अमरावती दौऱ्यावर ठाम

    भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या बुधवार १७ नोव्हेंबरला अमरावती दौरा करणार होते. संचारबंदी लागू असल्याने किरीट सोमय्यांनी अमरावतीचा दौरा रद्द करावा अशी नोटीस अमरावती पोलिसांनी दिली आहे.I want to meet the people of Amravati; Somaiya insists on Amravati tour even after police notice


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली.दरम्यान अमरावतीमध्ये हिंसा घडली असल्यामुळे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू केली आहे.अमरावतीमध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून दहशतीचं वातावरण आहे.भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या बुधवार १७ नोव्हेंबरला अमरावती दौरा करणार होते.

    संचारबंदी लागू असल्याने किरीट सोमय्यांनी अमरावतीचा दौरा रद्द करावा अशी नोटीस अमरावती पोलिसांनी दिली आहे. अमरावतीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात आली असून या सार्वजनिक शांततेस बाधा न येण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण अमरावती दौरा रद्द करावा असे अमरावती पोलिसांनी किरीट सोमय्या यांना म्हटलं आहे.



    पोलिसांची नोटीस मिळताच किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. “आता ठाकरे सरकारने माझ्या उद्याच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. मला अमरावतीच्या लोकांना भेटायचे आहे” असे सोमय्या यांनी म्हटल आहे. तसेच पोलिसांची नोटीसही सोमय्यांनी प्रसिद्ध केली आहे.

    पुढे सोमय्या म्हणाले की , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करुन अमरावती दौऱ्याबाबत निर्णय घेणार आहे. अमरावतीमध्ये लोकं खूप घाबरले आहेत. हिंदू समजात एका बाजूला दहशत माजवली जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकार मूक समर्थन देत आहे. त्यावेळी तिथल्या लोकांचे सांत्वन करण्यासाठी भीती दूर करण्यासाठी मला अमरावतीमध्ये जायचे आहे.

    दरम्यान सोमवारी रात्री उशीरा अमरावती पोलिसांनी नोटीस दिली असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. सत्तेसाठी हिंदू समाजावर दहशत माजवणार असाल तर देव तुम्हाला सुबुद्धी देवो अस देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

    I want to meet the people of Amravati; Somaiya insists on Amravati tour even after police notice

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!