• Download App
    Ajit Pawar लाडक्या बहिणींना 2100 द्यायचेत; पण मलाही हिशेब

    Ajit Pawar : लाडक्या बहिणींना 2100 द्यायचेत; पण मलाही हिशेब द्यावा लागतो; अजित पवारांचे वक्तव्य

    Ajit Pawar

    प्रतिनिधी

    नांदेड : Ajit Pawar  आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाहीत, असे बोललेलो नाही. पण सध्या आमची परिस्थिती नाही. परिस्थिती बदलल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देऊ, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड येथे एका सभेत बोलताना केला. राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. सगळी सोंग करता येतात पैशांचे सोंग करता येत नाही. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे अनेक जण बोलतात. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, असेही अजित पवार म्हणाले.Ajit Pawar

    राज्यात महायुती सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा होईल, असे वाटत होते. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली नाही. त्यानंतर विरोधकांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून सरकारवर टीका केली होती.



    मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा लावावा लागतो

    शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे अनेक जण बोलतात. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7 लाख 20 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये पेन्शन, होणारे पगार, राज्य सरकारने काढलेल्या कर्जांचा व्याज जाईल. राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींसाठी आहे. विरोधक ही योजना बंद करतील असे म्हणत होते. अनेक महिला भेटल्या. त्यांनीही मला विनवले 1500 रुपये देता 2100 रुपये द्या. मी नाही म्हटलेले नाही. ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळी तुम्हाला 2100 रुपये देणार. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता कसा मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो, असे अजित पवार म्हणाले.

    मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय

    सगळी सोंग करता येतात पैशांची सोंग करता येत नाहीत. मला दिलेली योजना चालू ठेवायची आहे. सरकारला चालू ठेवायचे आहे. त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत. काही बँकांना आम्ही तयार केले आहे. जर तुम्हाला 50 हजार कर्ज काढून, एकत्र येऊन व्यवसाय करायचा आहे. लाडक्या बहिणींमध्ये ज्या महिला या योजनेत बसतात त्यांनी एकत्र येऊन 20 एक महिला आल्या तर 20 गुणिले 50000 साधारण 10 लाख रुपये घेऊन तुम्ही तुमचे काम करू शकता. वीस महिलांचे घेण्याला 30 हजाराने पैसे येतील. तुमच्या व्यवसायाचा हप्ता तुम्हाला या पैशातून देता येईल. हा उपाय राज्य सरकारने आणला आहे असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही तिजोरीत खडखडाट आहे असे समजू नका. मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय असेही अजित पवार म्हणाले.

    2100 काय 3 हजार देऊ, पण थोडा वेळ थांबा

    दरम्यान, लाडकी बहीण योजना सुरुच रहाणार आहे, या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. 2100 काय तीन हजार रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावे लागेल, असे आमदार परिणय फुके म्हणालेत. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, 2100 नाही तर तीन हजार रुपये देऊ पण काही दिवस थांबावे लागणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्याची परतफेड आम्ही करणार आहोत, 1500 रुपये सुरू ठेवणार आहोत, आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतशे 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर 3000 हजार रुपये देऊ, असे आमदार परिणय फुके यांनी म्हटले आहे.

    I want to give 2100 to my beloved sisters; but I also have to give an account; Ajit Pawar’s statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस