ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.‘I think the rhythm is fun, why the members, show me’; Udayan Raje expressed anger
विशेष प्रतिनिधी
सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याला जिल्हा बँकेने कर्ज दिलेले आहे, याप्रकरणीच ईडीची नोटीस बँकेला मिळाली. या प्रकरणाची माहिती बँकेचे संचालक खासदार उदयनराजे भोसले यांनी संचालक मंडळाकडे मागितली मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
उदयनराजे हात जोडून विनंती करत म्हणाले, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा, असे आवाहन करत संचालक मंडळाला त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ही बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा, असे आवाहन त्यांनी केले.
ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठं जायचं. परिणामांना मी घाबरत नाही, जे व्हायचंय ते होऊ द्या, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला यावेळी दिला. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. मी शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतोय, असंही उदयनराजेंनी स्पष्ट केले.
यावेळी उदयनराजे म्हणाले, बँक टिकून रहावी असं मला वाटत आहे. मला माहिती आहे की, मी बोलत असताना अनेकांना वाटत असेल की खूप मस्ती आलीय. माझी नका जिरवू, मेहरबानी करा. माझी विनंती आहे. मी तुमचा कोणाचा दुश्मन नाहीये. हात जोडून विनंती करतो. ही बँक शेतकरी आणि शेतकरी सभासदांची आहे. या गोरगरीब शेतकरी सभासदांच्या वतीने विनंती करतो ही बँक राहू द्या.
‘I think the rhythm is fun, why the members, show me’; Udayan Raje expressed anger
महत्त्वाच्या बातम्या
- Pm Modi italy visit : पीएम मोदींकडून पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचे निमंत्रण, पर्यावरण बदल आणि गरिबी निर्मूलनावर झाली चर्चा
- राजनाथ सिंहांनी पंतप्रधान मोदींची महात्मा गांधींशी केली तुलना, म्हणाले- पीएम मोदी म्हणजे 24 कॅरेटचे खरे सोने!
- भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्यांसाठी मेहबूबा सरसावल्या, अटक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींना पत्र
- अॅपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्ट बनली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी, 2.49 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप