‘’सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत, फक्त …’’ असंही अजित पवार म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज महाभूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकरामध्ये सामील झाले आहेत. एवढच नाही तर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदरांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर अजित पवारांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना, एक गौप्यस्फोट केला. ‘’राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करत होतं. परंतू मी शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.’’ असं ते म्हणाले. I resigned from the post of Leader of the Opposition on Friday Ajit Pawars secret explosion in the press conference
याशिवाय “ सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त बैठका होत आहेत, प्रत्येकाची वेगवेगळ्या राज्यात वेगळी परिस्थिती आहे. देशात कुठं काँग्रेस व ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस, कुठं आप विरुद्ध काँग्रेस, पंजाबमध्येही तसंच आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाची बैठक होते तेव्हा त्यातून काहीच साध्य होत नाही. आपला एवढा मोठा देश आहे. आता तर जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामुळे देशात मजबूत खंबीर नेतृत्वाची गरज आहे. ती गरज असल्यामुळे आम्ही सर्वांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला. ” असं म्हणत अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली.
याचबरोबर “अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्वजण एकत्र बसायचो. सध्या देशाची आणि राज्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याचा विचार करता विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं मत आलं. आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आमच्याबरोबर जवळपास बहुसंख्य आमदार, सर्व पक्ष आहे. मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. मंत्रिमंडळात पुढे पुन्हा विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी इतर सहकाऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे. ” असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
I resigned from the post of Leader of the Opposition on Friday Ajit Pawars secret explosion in the press conference
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल’’
- ‘’युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती…’’ आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!
- इतरांच्या मानवी चुका, पण फडणवीसांच्या द्वेषापोटी समृद्धी महामार्गावर ठपका!!
- ‘’पवार, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले’’ बावनकुळेंचा शरद पवारांवर घणाघात!