समाज वादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Abu Azmis समाजवादी पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. अबू आझमींनी औरंगजेबाची स्तुती केली होती. यानंतर ते वादात सापडले आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले. आता त्यांनी सभापतींना पत्र लिहून त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याची मागणी केली आहे.Abu Azmis
अबू आझमी यांनी पत्रात लिहिले आहे की, ३ मार्च रोजी सभागृहातून बाहेर काढल्यानंतर मीडिया प्रतिनिधी त्यांना कायमच पिछा पुरवत आहेत. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची तुलना राहुल गांधींशी केल्याबद्दल माध्यमांनी त्यांना औरंगजेबाबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, औरंगजेबाच्या कारकिर्दीत भारताला सोने की चिडीया म्हटले जात असे. त्याच्या राजवटीने आकर्षित होऊन इंग्रज भारतात आले.
काय म्हणाले अबू आझमी? –
अबू आझमी यांनी स्पष्ट केले की, “मी इतिहासाचा संदर्भ दिला आणि म्हटले की औरंगजेब हा एक महान प्रशंसक होता. औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माचा कोणताही संघर्ष नव्हता. तो सत्तेसाठीचा लढा होता. तो जमिनीसाठीचा लढा होता. मी जाती आणि धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. माझ्या विधानावरून हे स्पष्ट होते की मी जे काही बोललो ते इतिहासाच्या संदर्भात बोलले होते. विधान देताना मी कुठेही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. माझे विधान माध्यमांमध्ये चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले, म्हणूनच मी माझे निलंबन मागे घेण्याची विनंती करतो.”
I request you to withdraw my suspension Abu Azmis letter to the Assembly Speaker
महत्वाच्या बातम्या
- डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफचा बडगा उगारताच चीनला भासली भारताच्या मदतीची गरज!!
- Chhattisgarh : छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण ; ४० लाखांचा होता इनाम!
- South Koreas : दक्षिण कोरियाचा सेल्फ गोल! लढाऊ विमानांनी स्वतःच्याच भागात पाडले बॉम्ब
- एम. के. स्टालिन यांना आलाय “नवे KCR” बनायचा मूड; delimitation विरोधात करताहेत छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट!!