प्रतिनिधी
मुंबई : माझ्या वडिलांना कुणी मारले मला माहिती आहे, पण त्या मागे मास्टरमाइंड कोण होता हे त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने का नाही शोधले?, असा रोकडा सवाल खासदार पूनम महाजन यांनी मुंबईचा जागर कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला आहे. प्रमोद महाजनांची हत्या झाली तेव्हा तुम्ही सत्तेत होतात याची आठवण पुनम महाजन यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांना करून देऊन त्यांच्यावर निशाणा साधला आहे. I know who killed my father, but why Congress-NCP did not find his mastermind
वांद्र्यातून म्हणजे मातोश्रीच्या अंगणातून भाजपच्या जागर मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. या पहिल्या मेळाव्यातच खासदार पुनम महाजन, आमदार आशिष शेलार आणि आमदार पराग अळवणी यांनी जोरदार तोफा डागल्या आहेत.
त्याचवेळी पूनम माझा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. भाजप आणि शिवसेनेत जर 50 – 50 चा फॉर्म्युला ठरला होता, तर मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंनी भाजपला महापौरपद का दिले नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पूनम महाजन म्हणाल्या :
उद्धव ठाकरेंनी मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन फक्त राजकारण केले. राज्यात आता मराठी – गुजराती असा वाद निर्माण करताय? तुम्ही हे कदाचित विसरले असाल की गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष मराठी आहेत. गुजरातमध्ये मराठी माणसाने जो झेंडा फडकवला त्याचा अभिमान उद्धव ठाकरेंना नाही का?
युतीमध्ये भांडण झाले, दोन भावांमध्ये महाभारत झाले हे खरे पण ते घडवणारे शकुनी कोण होते?, हे सर्वांना माहिती आहे.
शकुनींनी सर्व घडवले आणि स्वत: सत्तेत जाऊन बसले. मी काही बोलले, तर माझ्या वडिलांना कुणी मारले?, असा प्रश्न हे सगळे विचारतील. पण माझ्या बापाला कुणी मारले हे मला माहिती आहे, तो प्रश्न निर्माण करुन काही होणार नाही, पण त्या मागे मास्टरमाइंड कोण होते? हे तुम्ही शोधून दाखवले नाही.
भाजपचा महापौर का नाही
2014 आणि 2019 ला मी महायुतीमुळे खासदार झाले, यांचा मला अभिमान आहे. मित्रपक्षाला याचा अभिमान का नाही? जर 50 – 50 चा फॉर्म्युला ठरला होता तर मुंबईत मनपात उद्धव ठाकरेंनी भाजपला महापौरपद का दिले नाही? मुंबईत भाजपचा महापौर बसला असता तर आज ही वेळ आली नसती.
I know who killed my father, but why Congress-NCP did not find his mastermind
महत्वाच्या बातम्या
- टीव्ही 9 चे पत्रकार कै. पांडुरंग रायकरचे कुटुंब अजूनही सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या मदतीच्या प्रतीक्षेत
- मुंबईतील इंटरनॅशनल हलाल शो इंडिया रद्द करा; हलाल सक्तीविरोधी कृती समितीचे आंदोलन
- नोकरीची संधी : भारतीय पोस्ट खात्यात 98083 पदांची मेगाभरती; फक्त 10 उत्तीर्णतेची अट
- 3 पुस्तके लिहून जिहादी दहशतवादाची चिरफाड करणारे इंटेलिजन्स ब्युरो अधिकारी आर. एन. कुलकर्णींची म्हैसुरूमध्ये हत्या