समीर वानखेडे यांची नोकरी वर्षभरात जाणार तसेच वानखेडे यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मलिक म्हणाले आहे.I got the uniform from the President, it is not in anyone’s hands to take it off – Sameer Wankhede
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील काही महिन्यांपासून ड्रग्स तस्करी आणि बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन सर्वांसमोर आले. एनसीबीच्या टीमने अनेक ठिकाणी धाडी टाकत अनेक बड्या सेलिब्रेटींना अटक केली. यामध्ये एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कामगिरीचे चांगलेच कौतुक होत आहे.
अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांची नोकरी वर्षभरात जाणार तसेच वानखेडे यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मलिक म्हणाले आहे.
नवाब मलिक यांनी आज समीर यांच्यासंदर्भात ट्विट करत खळबजनक खुलासे केले आहेत.त्यावर समीर वानखेडे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. वानखेडे म्हणाले की ,”मला राष्ट्रपतींकडून वर्दी मिळाली; ते काढणे कोणाच्याही हातात नाही .मी त्यांना शुभेच्छा देतो”
ड्रग्ज हा सर्वात जास्त आर्थिक फायदा करून देणारा अवैद्य व्यापर आहे. विमान, जहाज, रेल्वे आणि रस्त्याने हा ड्रग्ज देशात येतो. याला आळा घालण्याची जबाबदारी ही अमदी पदार्थ नियंत्रण विभागाची आहे. आम्ही ते थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अस समीर वानखेडे म्हणाले.
I got the uniform from the President, it is not in anyone’s hands to take it off – Sameer Wankhede
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan khan drugs case : ‘या ‘ दिग्दर्शकाने म्हटले बॉलीवूडचे मौन लाजिरवाणे ; आज त्याचा मुलगा आहे- उद्या तुमचा असेल…
- 67th National Film Awards : नवी दिल्लीत विज्ञान भवनात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण, या कलाकारांना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार
- महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात , म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं हे सरकार
- अनैतिक संबंधांमधून जन्मलेल्या मुलीचा आईनेच केला खून