• Download App
    "मी सावरकर" महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रत्नागिरीच्या कश्ती सलीम शेखने जिंकली!!I am Savarkar "College oratory competition was won by Kashti Salim Sheikh of Ratnagiri

    “मी सावरकर” महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा रत्नागिरीच्या कश्ती सलीम शेखने जिंकली!!

    प्रतिनिधी

    पुणे : “मी सावरकर” या महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत रत्नागिरीच्या कश्ती सलीम शेख या विद्यार्थिनी प्रथम पारितोषिक मिळवत स्पर्धा जिंकली. महाविद्यालयीन गटात तिने पहिला पुरस्कार मिळवलाच, पण त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेची ती महाविजेता ठरली. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तिला हे पारितोषिक देण्यात आले. यावेळी तिचे स्फूर्तीदायक भाषणही झाले.I am Savarkar “College oratory competition was won by Kashti Salim Sheikh of Ratnagiri

    पुण्यातील सीए रणजीत सदाशिव नातू हे दरवर्षी “मी सावरकर” ही वक्तृत्व स्पर्धा सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करतात. या स्पर्धेचे हे यंदाचे पाचवे वर्ष होते.

    कश्ती सलीम शेख ही जन्माने मुस्लिम. रत्नागिरीच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर, त्यांच्या विचारांवर आणि सावरकरांनी घालून दिलेल्या आदर्शांवर ती बोलली. सावरकरांचे हिंदुत्व हे संपूर्ण मानव जातीला मुक्तीचा मार्ग सांगणारे होते. ते संकुचित अजिबात नव्हते कोणत्याही प्रार्थना पद्धतीला अथवा उपासना पद्धतीला सावरकरांच्या हिंदुत्वाचा विरोध नाही. सावरकरांचे हिंदुत्व हे देश संरक्षक आहे. आक्रमक नव्हे, असे स्पष्ट प्रतिपादन कश्तीने केले. सावरकरांना एका जातीत अडकवण्याचा इथल्या बुद्धीवंतांचा प्रयत्न या पुढच्या काळात निष्फळ ठरेल असा आशावादही तिने व्यक्त केला.

    “मी सावरकर” या व्हाट्सअप द्वारे होणाऱ्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज सावरकर पुण्यतिथी निमित्त्य समारंभपूर्वक पुण्यात फर्गसन महाविद्यालयाच्या त्याच सभागृहात झाला जिथून सावरकरांनी अनेक गाजलेली भाषणे केली आहेत.

    I am Savarkar “College oratory competition was won by Kashti Salim Sheikh of Ratnagiri

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !