विशेष प्रतिनिधी
मुबंई : सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. डिसेंबरमध्ये जेव्हा सर्व बॉलीवूड मालदीवमध्ये सुट्ट्यासाठी गेले होते. त्यावेळी समीर वानखेडे देखील मालदीवमध्ये जाऊन वसुलीचे काम करत होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
I am receiving threatening phone calls due to allegations made against Sameer Wankhede: Nawab Malik
नुकताच नवाब मलिक यांनी आणखी एक आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे. समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आपल्या धमकी देणारे फोन असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार नवाब मलिक यांनी याबाबत तक्रार देखील दाखल केली आहे असं सांगण्यात येते
या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबरमध्ये मी दुबईला गेलो नव्हतो किंवा कुठेही वसुली करण्यासाठी गेलो नव्हतो असे समीर वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मालदीवला आपण आपल्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी गेलो होतो आणि ऑफिशियली सुट्टी घेऊन मी गेलो होतो. याची चौकशी केली तर तुम्हाला सर्व प्रकरण कळेल. असे देखील समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.
I am receiving threatening phone calls due to allegations made against Sameer Wankhede: Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा बाप काढला; अजितदादा म्हणाले “नो कॉमेंट्स”
- चिथावणीखोर भाषणे; जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला
- महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
- ‘लसीकरण मोहिमेवर व्हीआयपी संस्कृतीचा दबदबा नव्हता’, पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील टॉप 10 मुद्दे
- पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
- ‘जनतेसोबत घृणास्पद विनोद सुरू आहे’, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल