विशेष प्रतिनिधी
पुणे: पैसे खाणाऱ्या वाघाची पैसे खाणारी वाघीण अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली होती.वाघ आहे मी लक्षात ठेवा, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही, अशा शब्दांत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले आहे.I am a tiger and dont afraid of foxes and dogs, said BJP’s Chitra Wagh
पैसे खाणाऱ्या वाघाची पैसे खाणारी वाघीण अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली होती.चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकत आहेत. कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले.
ता माझ्या परिवाराची बदनामी सुरू. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,” असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.
मेहबूब शेख यांनी निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेवरुन चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना म्हणाले, चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो. लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. तुमच्या नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते.
I am a tiger and dont afraid of foxes and dogs, said BJP’s Chitra Wagh
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीच्या चौकशीला सामोरे जायलाच आलोय; ममतांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर
- सरसंघचालक भागवत आज मुस्लिम विद्वानांना भेटणार, इन्फोसिसवरील संघाच्या मुखपत्रात प्रकाशित लेखापासून राखले अंतर
- उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्यावर गुन्हा दाखल, दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा आरोप
- इम्रान खान यांचे पुन्हा विखारी वक्तव्य! धमकी देत म्हणाले – भारताचा ‘खरा चेहरा’ जगासमोर आणू
ReplyReply allForward
|