• Download App
    देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री : प्रस्थापित आणि पुरोगामी माध्यमांचा "दुःखयुक्त आनंद" किंवा "आनंदयुक्त दुःख"!! Hypocrats in maharashtra are unhappy over acceptance of dy chief ministership by devendra Fadanavis

    देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री : प्रस्थापित आणि पुरोगामी माध्यमांचा “दुःखयुक्त आनंद” किंवा “आनंदयुक्त दुःख”!!

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार ही सर्वात लाडकी योजना आहे. तब्बल 80 % कोरडवाहू शेती असलेल्या महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून शेतीसाठी चांगली सिंचन व्यवस्था निर्माण करण्याची ही योजना आहे. पण ठाकरे – पवार सरकारने ही योजना बासनात गुंडाळून ठेवून त्यावर संशय व्यक्त करत चौकशीचा ससेमिरे लावला. Hypocrats in maharashtra are unhappy over acceptance of dy chief ministership by devendra Fadanavis

    पण आजच्या लेखाचा विषय हा नाही. जशी देवेंद्र फडणवीस यांची सर्वात लाडकी योजना जलयुक्त शिवार आहे, तसे देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले म्हणून प्रस्थापित माध्यमांना आणि पुरोगामी पत्रकारांना “दुःखयुक्त आनंद” किंवा “आनंदयुक्त दुःख” झाले आहे!! ही “विशिष्ट” भावना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केली आहे!!

    अनेकांना आता देवेंद्र फडणवीस हे तरुण मुत्सद्दी नेते असल्याचा “दिव्य लोकमती” साक्षात्कार झाला आहे. अनेकांनी त्यांच्या नेतृत्व कोणाची रसभरीत वर्णने केली आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांवर कसा अन्याय केला आहे, फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री पद हा भाजपचा केंद्रीय नेतृत्वाचा कसा “डाव” आहे, वगैरे अनेक वर्णने करताना त्यांची लेखणी थकलेली नाही.

    पण यापूर्वी अनेक पुरोगामी आणि प्रस्थापित माध्यमांना असाच “साक्षात्कार” उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत झाला होता त्यांनी जेव्हा भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पद स्वीकारले तेव्हा उद्धव ठाकरे हे पुरोगामी आणि प्रस्थापित प्रसार माध्यमांच्या दृष्टीने एकदम “सुसंस्कृत नेते” झाले होते. पण शिवसेनेतील बंडामुळे आता त्यांना पायउतार व्हावे लागल्याने त्याचे “साक्षात्कारी दुःखही” प्रस्थापित पुरोगामी माध्यमांना आणि पत्रकारांना झाले आहे!!


    DEVENDRA FADANVIS : मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम… मेरे ससूर दाऊद कें राईट हँड थे !आता दुसरा पेन ड्राईव्ह बॉम्ब …अर्शद खान – मुद्दशीर लांबे संवाद…


     

    पण त्या पलीकडे जात आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याऐवजी उपमुख्यमंत्री झाले म्हणून अनेकांना “दुःखयुक्त आनंद” झाला आहे. त्याला फार तर “आनंदयुक्त दुःख” असेही म्हणता येईल. कारण मराठी माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाची वर्णने करताना उपमुख्यमंत्री पदाला अधिकार कसा नसतो, त्याचा मंत्रिमंडळातला दर्जा त्याच्या खात्यावरच कसा अवलंबून असतो, त्याला सर्वसामान्य मंत्रीपदाचेच भत्ते अधिकार आणि पगार मिळतो वगैरे तपशीलवार वर्णने केली आहेत. इतकेच नाही तर देवेंद्र फडणवीसांसारख्या उभरत्या तरुण नेत्याला उपमुख्यमंत्री पदी अवनत करून भाजपने त्याचा त्यांचा अवमान केला आहे, याचे विलक्षण दुःखही अनेक पुरोगामी पत्रकारांना झाले आहे.

    जणू काही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते तर या पुरोगामी पत्रकारांचे घोडे गंगेतच न्हाले असते…!! जसा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतले मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिवसेना हिंदुत्वापासून बाजूला झाल्याचा आनंद पुरोगामी आणि प्रस्थापित पत्रकारांना झाला होता, तसेच “आनंदयुक्त दुःख” देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदामुळे झाले आहे. किंबहुना वस्तुस्थिती तर ही आहे की देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद ते केवळ ब्राह्मण असल्यामुळे या पुरोगामी आणि प्रस्थापित पत्रकारांना खूपत होते. पण तसे थेट लिहायचे कसे?? म्हणून मग अलटून पालटून काही खुसपटे काढून फडणवीसांवर वार करायच्या क्लुप्त्या ते लढवत असत आणि आता जेव्हा भले नाराजीने का होईना, पण त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यावर आपला आपल्याला झालेला आनंद लपवायचा कसा??, याची चिंता पुरोगामी आणि प्रस्थापित माध्यमांना भेडसावल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या शब्दांमधून आपला आपले “आनंदयुक्त दुःख” किंवा “दुःखयुक्त आनंद” व्यक्त केला आहे.

    पण महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या बद्दलचे पुरोगामी आणि प्रस्थापित माध्यमांचे उफाळलेले प्रेम जसे ढोंगी होते, तसाच फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाचा “दुःखयुक्त आनंद” किंवा “आनंदयुक्त दुःख” तितकेच ढोंगी आणि पवार बुद्धीचे आहे, ही वस्तुस्थिती आहे!! फडणवीसांची पक्षनिष्ठा आणि पक्षादेश पालन करण्याचे त्यांचे कर्तव्य यामुळे प्रस्थापित पुरोगामी पत्रकार सर्वाधिक दुःखी आहेत!! दुर्दैवाने त्यांचे हे दुःख भाजपचे केंद्रीय नेतृत्व समजून घेत नाही हे आणखी मोठे दुःख आहे!!

    Hypocrats in maharashtra are unhappy over acceptance of dy chief ministership by devendra Fadanavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस