• Download App
    सांगलीच्या राम मंदिर चौकात पंजाब सरकार विरोधात मानवी साखळी आंदोलन|Human chain agitation against Punjab government at Ram Mandir Chowk, Sangli

    सांगलीच्या राम मंदिर चौकात पंजाब सरकार विरोधात मानवी साखळी आंदोलन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात पंजाब सरकारने सुरक्षेत त्रुटी ठेवून त्यांचा जीव धोक्यात आणल्याची टीका करीत भाजपने बुधवारी सांगलीत मानवी साखळी आंदोलन केले.पंजाब सरकारचा निषेधही नोंदविण्यात आला.Human chain agitation against Punjab government at Ram Mandir Chowk, Sangli


    विशेष प्रतिनिधी

    सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (५ जानेवारी) पंजाब दौऱ्यावर आले होते. त्यावेळी हुसैनीवाला येथे जात असताना त्यांचा ताफा निदर्शकांनी रोखला होता.त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्व कार्यक्रम रद्द करून पंतप्रधानांना मागे फिरावे लागले होते.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात पंजाब सरकारने सुरक्षेत त्रुटी ठेवून त्यांचा जीव धोक्यात आणल्याची टीका करीत भाजपने बुधवारी सांगलीत मानवी साखळी आंदोलन केले.पंजाब सरकारचा निषेधही नोंदविण्यात आला.



    सांगलीच्या राम मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले.यावेळी पंजाब सरकारच्या निषेधाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते.यावेळी आंदोलनात ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय सदस्य संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, जयगोंडा कोरे, प्रकाश बिरजे, विनायक सिँहासने, सुब्राव मद्रासी, भारती दिगडे, ऊर्मिला बेलवलकर, ज्योती कांबळे, स्मिता पवार, आदी उपस्थित हाेते.

    निवेदनात भाजपने म्हटले आहे की, नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर असताना पंजाबमधील काँग्रेस सरकारने त्यांच्या सुरक्षेत त्रुटी ठेवून कट-कारस्थान रचून त्यांचे प्राण धोक्यात आणले होते; परंतु देशातील सक्षम संरक्षण यंत्रणेच्या तत्परतेने मोदी या संकटातून बचावले.

    तसेच पंजाबमधील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक केलेल्या या कारस्थानाचा निषेध करीत आहोत. जर भविष्यात अस परत काही अपरिहार्य घडले तर पंजाब शासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.

    Human chain agitation against Punjab government at Ram Mandir Chowk, Sangli

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!