प्रतिनिधी
मुंबई : ठाण्यातील रोशनी शिंदे कथित मारहाण प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची संभावना फडतूस गृहमंत्री अशी केल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रचंड संताप उसळला असून त्याचे प्रखर प्रतिबिंब सोशल मीडियात पडले आहे. महाराष्ट्र सर्व देशातल्या तरुणाईने वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #FadtusUddhav हॅशटॅग चालवून प्रचंड गदारोळ उडवून दिला असून लाखो नागरिकांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. Huge outrage on social media against Uddhav Thackeray’s criticism
रोशनी शिंदे यांना ठाण्यात भेटून आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणून अत्यंत खालच्या भाषेत शरसंधान साधले होते. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून जोरदार प्रत्युत्तर देखील दिले आहे. आपल्याच मंत्रिमंडळातले दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर जे मुख्यमंत्री त्यांचा राजीनामाही मागू शकले नाहीत, त्यांच्याच भोवती लाळ घोटत बसले त्यांनी मला फडतूस म्हणावे, हा त्यांना अधिकार तरी आहे का??, असा परखड सवाल फडणवीसांनी केला. मी नागपूरचा आहे. मला त्यांच्यापेक्षाही खालची भाषा येते पण मी ती बोलणार नाही पण ज्या दिवशी तोंड उघडेन, त्या दिवशी पळताभुई थोडी होईल, असा इशारा दिला.
त्यानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #FadtusUddhav हा हॅशटॅग सुरू झाला असून त्यावर भाजपचे हजारो कार्यकर्ते आणि लाखो सिटीजन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्ती विरुद्ध कायद्याचा दंडा चालवल्याने विरोधक फ्रस्टेट झाले आहेत आणि त्यातूनच फडतुस गृहमंत्री अशी खालच्या स्तराची भाषा वापरत आहेत, असे शरसंधान अनेकांनी साधले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरची तरुणाई देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे दिसत आहे.
Huge outrage on social media against Uddhav Thackeray’s criticism
महत्वाच्या बातम्या
- ‘’…तर राहुल गांधींच्या फोटोला चपला मारण्याचं काम उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या सेनेने केलं असतं’’ देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला!
- ”सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि हे हरामखोर…” देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसवर टीकास्त्
- COVID -19 करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने घेतला मोठा निर्णय!
- ”सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि हे हरामखोर…” देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसवर टीकास्त्र!