प्रतिनिधी
मुंबई : देशात वाढत असलेल्या इस्लामी जिहादी कारवाया, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतराविरुद्ध मुंबईत सकल हिंदू समाजाने महाप्रचंड मोर्चा काढला. पण या मोर्चावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र लव्हचा अर्थ कळतो, पण जिहाद माहिती नाही, असे वक्तव्य केले आहे. Huge march of Hindus in Mumbai against love jihad, land jihad, conversion
देशासह महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा व्हावा, महाराष्ट्रातले आणि देशातले बेकायदा घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना हाकलून द्यावे, त्यांचा लँड जिहाद मोडीत काढावा, अशा विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाने आज मुंबईत विराट मोर्चा काढला. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातून या मोर्चाची सुरूवात झाली. परळच्या कामगार मैदानावर या मोर्चाची सांगता झाली.
हातात भगवे झेंडे घेऊन लाखो मुंबईकर लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे नजर जाईल तिथे भगवे झेंडेच झेंडे दिसले. शिवाजी पार्क परिसर भगवामय झाला. मुंबईत जणू भगवे वादळ आवतरल्याचे चित्र निर्माण झाले. विशेष म्हणजे या मोर्चात पहिल्यांदाच शिंदे गट आणि भाजपचे नेते एकत्र आले. दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित मोर्चात उतरल्याने महापालिका निवडणुकीसाठी हे नेते वातावरण ढवळून काढत असल्याची चर्चा सुरू आहे.
आज सकाळी 10 वाजल्यापासून या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.
जो हिंदू हित का काम करेगा
मोर्चेकऱ्यांच्या हातात भूमी रक्षा, राष्ट्र सुरक्षा असं लिहिलेले फलक होते. गळ्यात भगवा गमछा, डोक्यावर भगवी टोपी घालून मोर्चेकरी आले होते. तसेच अनेकांच्या हातात भगव्या पताका होत्या. या मोर्चात वंदे मातरम, जय श्रीराम आणि जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे हा संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला.
भाजपसोबत शिंदे गटही मोर्चात
या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि केशव उपाध्ये या मोर्चात सामील झाले.
या मोर्चात शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि सदा सरवणकरही सहभागी झाले. पहिल्यांदाच मुंबईतील मोर्चात शिंदे गट आणि भाजप नेते एकत्रित रस्त्यावर उतरले.
मात्र या मोर्चा संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याला लव्ह या शब्दाचा अर्थ कळतो, पण जिहाद हा शब्द आपल्याला माहिती नाही, अशा शब्दात हिंदू समाजाच्या मोर्चाची खिल्ली उडवली आहे.
Huge march of Hindus in Mumbai against love jihad, land jihad, conversion
महत्वाच्या बातम्या