- CBSE 12th Result 2021 @cbseresults.nic.in: सीबीएसई बारावी निकाल आज जाहीर होणार असून विद्यार्थी आपला निकाल सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in किंवा cbse.gov.in वर पाहू शकतात.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : CBSC चा निकाल आज जाहीर होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12 वी निकालाचीही उत्सुकता आहे. मात्र राज्य बोर्डाचा 12 वीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज (30 जुलै) जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घोषित केला जाणार आहे. HSC Result 2021: CBSC result today; Get this result by SMS – Maharashtra Board 12th exam results now in August!
विद्यार्थी आपला निकाल निकाल सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in किंवा cbse.gov.in यासह इतर प्लॅटफॉर्मवर देखील पाहू शकतात. विद्यार्थ्यांना फक्त आपला रोल नंबर टाकून निकाल पाहायचा आहे.
CBSE result via SMS :
सीबीएसईने 12 वी परीक्षेचा निकाल बोर्डाची वेबसाईट cbseresults.nic.in वर जाहीर होत असल्याने, या वेबसाईटवर अतिरिक्त भार येण्याची शक्यता आहे. दुपारी दोन वाजता सर्व विद्यार्थी या वेबसाईटवर भेट देऊ शकतात. त्यामुळे ही वेबसाईट क्रॅश होऊ शकते. मात्र अशा परिस्थितीत मनस्ताप करुन न घेता, निकाल पाहण्यासाठी दुसरे पर्यायही तपासावे. विद्यार्थ्यांसाठी CBSE 12 वीचा निकाल SMS द्वारेही पाहता येऊ शकतो.
SMS आणि IVRS
विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन <CBSE12>space<Roll Number>space<Admit Card ID> हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल.
याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.
राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती मिळत आहे. जुलैअखेर इयत्ता 12 वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला. त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले, यामुळे ऑगस्ट महिन्यात निकाल लागणार आहे.
सीबीएसईचे प्रादेशिक संचालक रणबीर सिंह यांनी सांगितले की, रोल नंबरला विद्यार्थ्याची ओळख मानून विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्यापासून निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध नसल्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना याची माहिती नसते.
अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सीबीएसईने रोल नंबर फाइंडर लिंक जारी केली आहे. त्या लिंकद्वारे विद्यार्थी आपला रोल नंबर शोधून अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.
HSC Result 2021: CBSC result today; Get this result by SMS – Maharashtra Board 12th exam results now in August!