• Download App
    बैलगाडा शर्यतीवर बंदी मूळात लादलीच कशी?? वाचा तपशील!! How was the ban on bullock cart race originally imposed?? Read details!!

    बैलगाडा शर्यतीवर मूळात बंदी लादली कोणी आणि उठवली कशी??, वाचा तपशील!!

    प्रकाश गाडे

    ‘बैलगाडा शर्यत’ वरील बंदी माननीय सर्वोच्च न्यायालयाने उठवली, सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन!

    पण, ही बंदी उठवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे आमदार महेश लांडगे, मा. आमदार नरेंद्र पाटील या सर्वांचे शेतकरी व बैलगाडा शर्यत प्रेमी यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार मानले पाहिजेत. How was the ban on bullock cart race originally imposed?? Read details!!

    पण मूळात बैलगाडा शर्यत कशी बंद पाडली?? कशामुळे बंदी घातली??

    तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बैलगाडा शर्यत कोणी आणि का बंद पडली? प्राणी छळ प्रतिबंधक कायदा आपल्या देशात अस्तित्वात आहे. या कलमाच्या आधारे आधारे काही प्राणी ज्यात वाघ, सिंह, चित्ता, अस्वल आणि माकड यांचा वापर मनोरंजनासाठी करता येणार नाही. महत्वाचा मुद्दा यात असा आहे की, हे सर्व जंगली प्राणी आहेत.

    मग, आता प्रश्न पडला असेल की, यात बैल कसा घुसवला गेला?? इथेच खरी मेख आहे. यूपीए 2 मनमोहनसिंग सरकारचे तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी या कायद्यात दुरुस्ती करून बैल या प्राण्याला त्या जंगली प्राण्यांच्या यादीत घातले होते.

    तुम्हाला कळलं असेल आता की, बैलगाडा शर्यत बंद करण्यासाठी कोणते कारण सुप्रीम कोर्टाला मिळाले. मनमोहनसिंग सरकार मधील मंत्री जयराम रमेश एवढा मोठा कायद्यात करत असताना कोणत्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता का? शेतकऱ्यांचा सल्ला घेतला होता का? तर उत्तर आहे “नाही”.

    मग, कुणाच्या संगण्यावरून त्यांनी कायद्यात बदल केला? तर माहिती अशी आहे की, जे लोकं बकरी ईदला बकरा कापला तर त्यांना त्रास होत नाही, पण बैल शर्यतीत धावला की यांच्या पोटात दुखायला लागतं. कारण, बैलगाडा शर्यत हे काही ‘कसाई’ घेत नाही तर बैलांचे पूजन करणारा घेतो.

    बैलगाडा शर्यत बंदी उठवण्याचा कायदेशीर लढा; देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत.

    ‘प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960 कलम 22 – 2 नुसार सर्वोच्च न्यायालयाने मे, 2014 ला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. तेव्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नुकतंच आलेल, आणि काही महिन्यांनी राज्यात देखील देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप सरकार आले.

    तेव्हा, भाजप आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन तत्कालीन पर्यटन मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली आणि अधिसूचना काढून गॅझेट मध्ये बदल करून, ती बंदी उठवली. पण, त्यावर देखील सुप्रीम कोर्टाने बंदी घातली. बैलगाडा शर्यत बंद केल्यानंतर देशभरात या विरोधात आवाज वाढू लागला, तसा महाराष्ट्रातही निघत होता.

    2017 ला तत्कालीन देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार असित्वात असताना, त्यांनी बैलगाडी शर्यत प्रेमीसाठी व गौवंश वाढीसाठी राज्यात कायदा केला व त्या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी देखील मिळवली. त्यामुळे राज्यात बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा झाला.

    पण, महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधात देखील काही लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली पण, मुंबई उच्च न्यायालय यासंदर्भात कोणताही निर्णय न देता हा विषय सुप्रीम कोर्टाकडे वर्ग केला.

    सुप्रीम कोर्टाने सर्व राज्याच्या याचिका एकत्रित करून फेब्रुवारी, 2018 ला हा विषय 5 सदस्यांच्या घटनापीठकडे सुनावणीसाठी पाठवला. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने बैलगाडा शर्यतीच्या आड येणाऱ्या तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत झाली.

    त्या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिफारस केली की, बैल हा धावणारा प्राणी आहे हे कोर्टात सिद्ध करावं लागेल. त्यासाठी ‘रनिंग अबिलिटी ऑफ बुल’ हा वैज्ञानिक अहवाल तयार करण्याची शिफारस केली.

    तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री यांना त्यासंदर्भात सूचना केली व ‘RUNNING ABILITY OF BULL’ हा अहवाल 2 महिन्यांत तयार केला आणि सुप्रीम कोर्टात दाखल केला. माननीय सुप्रीम कोर्टाने तत्कालीन महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या अहवाल स्वीकृत करून बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली.

    सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यत बंदी उठवली, ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेला अहवाल स्वीकृत करून. त्यासाठी अभ्यास किती महत्वाचा असतो, यातून स्पष्ट होते. नाहीतर सुप्रीम कोर्टात अभ्यास न करता गेले तर काय होते??, याची कल्पना मराठा आणि ओबीसी आरक्षणात बऱ्याच जणांना लक्षात आले असेल.

    त्यामुळे बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याचा सगळे श्रेय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाते. पण याचे श्रेय घेण्यासाठी कोल्हेकुई करत आहेत, कोणी बैलगाडी शर्यत वरील बंदी उठवली म्हणून, घोड्यावर चढलेले दिसत आहेत. पण, बंदी उठवण्यामागचा सर्व सत्य घटनाक्रम जनतेला कळवा त्यासाठी या लेखाचा प्रपंच!!

    How was the ban on bullock cart race originally imposed?? Read details!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!