• Download App
    फोन कुणाचे??, श्रेय कुणाला??; पण मणिपूरमधून विद्यार्थ्यांना कसे आणले??, वाचा त्याचे वास्तव!! How to bring students from Manipur read its reality

    फोन कुणाचे??, श्रेय कुणाला??; पण मणिपूरमधून विद्यार्थ्यांना कसे आणले??, वाचा त्याचे वास्तव!!

    प्रतिनिधी

    मुंबई : अस्वस्थ आणि हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मराठी विद्यार्थी अडकले. त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या चाणक्याने फोन कसे केले आणि त्यामुळे प्रश्न कसा सुटला??, याचे “बहारदार” वर्णन करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. पण प्रत्यक्षात काम कोणी केले आणि कसे केले??, वाचा त्याचे वास्तव!! How to bring students from Manipur read its reality

    आणि जीव भांड्यात पडला

    काल सकाळी नागपुरातले काही विद्यार्थी इंफाळ मणिपूर येथे अडकले आहे असे प्रवीण दादांनी फोन करून सांगितले. म्हणाले, नितीनजी, देवेंद्रजींच्या मदतीने आणि युवा मोर्चाच्या मदतीने काय करता येईल बघ. मला विद्यार्थ्यांची माहिती संदीप गवई दादा कडून मिळाली, तात्काळ देवेंद्रजींशी संपर्क साधला असता, त्यांनी आधीच ह्याबाबतचे पावले उचलली होती.

    त्या विद्यार्थ्यांशी जेव्हा बोलणे झाले तेव्हा एनआयटी ला १४ आणि ट्रिपल आयटी ला ८ असे २२ विद्यार्थी तिथे अडकले असून स्थानिक अस्थिरतेमुळे जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात ते होरपळले होते. युद्ध म्हटले तर अन्नाचा तुटवडा, असुरक्षेची भावना आणि बरेच काही. देवेंद्रजींनी आधीच तेथील डीजींशी बोलून सर्व व्यवस्था केली होती. पण हे विद्यार्थी वयाने कोवळे असल्याने घाबरले होते आणि जरा गांगरले सुद्धा होते.

    युवा मोर्चाच्या माध्यमातून काही मदत मिळते का बघत होते, तर थेट सैन्याच्याच अधिकाऱ्यांची यादी मिळाली. मराठा रेजिमेंटचे नाव आणि नंबर मिळतो का बघत होते तर नेमकं ते सापडले नाही आणि माझे बाबा शीख रेजिमेंट सोबत एकेकाळी होते म्हणून आपसूक मी शीख रेजिमेंटच्या कर्नल अतुल दिवाकर ह्यांना फोन केला. त्यांच्यासाठी माझा फोन हा एका स्ट्रेन्जर व्यक्तीचा फोन होता. पण ज्या अदबीने ते बोलले, त्यात का भारतीय सैन्य भारतीय सैन्य आहे ह्याची पुन्हा प्रचिती झाली. तात्काळ ते आमच्या नागपूरच्या वृक्षल गणवीर पर्यंत पोहोचले, मुलांचे मनोधैर्य वाढवले. ते सैन्याच्या सोबत सुरक्षित आहे ह्याची हमी दिली आणि इथेच आमच्या विद्यार्थी मित्रांचे काकणंभर का होईना पण टेन्शन दूर झाले. युनिफॉर्म मधला एक सिनियर ऑफिसर येऊन खात्री देतो ह्यात पेक्षा सुरक्षेची मोठी कुठलीच भावना असू शकत नाही अशी काहीशी प्रतिक्रिया ह्या विद्यार्थ्यांची होती. “वो फौजी आके गये ना दीदी, अब थोडा ठीक लग राहा है”.

    नाईट लाईट मध्ये फ्लाईंगची परवानगी नसल्याने उड्डाण आजच शक्य होते. रात्री सगळ्यांना धीर द्यायचा होता, अन्न पुरवायचे होते आणि पुन्हा महाराष्ट्राचा मार्ग धरायचा होता.

    संध्याकाळी त्यांना कॅम्पस मधून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, इथे जेव्हा मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो दिसले तेव्हा त्यांना खात्री पटली की जागा सुरक्षित आहे. रात्रीचा एक एक क्षण मुलं सकाळची वाट बघत होते आणि सूचना आली की एअरपोर्ट कडे रवाना व्हायचे आहे. महाराष्ट्र सरकारने एक स्पेशल विमान ह्यांच्यासाठी पाठवले होते. विमान रेग्युलर नसल्याने मुलांकडे बोर्डिंग पास नव्हते. पुन्हा त्यांना १०० किमी आधी अडवण्यात आले. कालच मुलांना सूचना दिल्या होत्या, “आपको भूक लगी, डर लगा, कुछ भी दिक्कत आयी तो मुझे तो फोन करना लेकिन फौजी कर्नल दिवाकर अंकल को सबसे पहले फोन करना”. आणि मुलांना अडचण आली, त्यांना अडवले. तात्काळ त्यांनी दिवाकर अंकल (कर्नल अतुल दिवाकर) ला फोन केला आणि ते फौजी, त्यामुळे त्यांना तात्काळ तिथून त्यांनी एअरपोर्ट च्या दिशेने धाडले.

    चेकिंग झाले, सिक्युरिटी झाली आणि मुले विमानात बसले. इंफाळ मध्ये इंटरनेट सेवा बंद असल्याने केवळ एसएमएस च्या माध्यमातून संवाद आणि संपर्क चालू होता. आता त्यांचे विमान उडाले आणि गोहाटी आसामला लॅन्ड झाले.

    आसामला आल्या आल्या त्यांनी सुटकेचा आणि स्वातंत्र्याचा एक वेगळा श्वास घेतला. आता व्हाट्स एप आहे. घरच्यांशी व्हिडियो कॉल आहे, आणि संध्याकाळी ४:३० ची वाट बघणे मुंबई च्या विमानाची…..

    प्रत्येक राज्य आपापल्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर घेऊन येतच आहे, पण २२ विद्यार्थ्यांसाठी घेतलेली देवेंद्रजींनी मेहनत, तात्काळ उचलेले पाऊले कर्नाटक इलेक्शनची धामधूम शिगेला आहे पण तत्परतेने डीजींशी तर बोललेच. २/३ विद्यार्थ्यांशी देवेंद्रदादा स्वतः बोलले, आणि काहींना एसएमएस सुद्धा पाठवले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात जे टीमवर्क बघायला मिळाले त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही.

    आणि सगळ्यात महत्वाचे, माझे बाबा एक फौजी आहेत. काल परवा काही काही शीख लोक देणगी मागायला आले होते. अगदी १० दिवसांपूर्वी गुरुद्वाराच्याच नावाने काही शीख देणगी घेऊन गेले होते, हे पुन्हा आले. काहीही घासाघीस न करता बाबांनी यथाशक्ती दान केले. मी बाबांना म्हटले बाबा कशावरून हे खरे बोलत होते. बाबांनी उत्तर दिले, “मी ७ वर्ष शीख रेजिमेंट सोबत सैन्यात काम केले आहे आणि ७१ ला युद्ध लढले आहे, ते कधी खोटे नाही बोलत”. बाबांचा तोच आत्मविश्वास बॅक ऑफ द माईंड होता आणि आपसूक शीख रेजिमेंटच्या कर्नल साहेबांना फोन केला. जी तात्काळ मदत त्यांनी केली त्याचे ऋण कोण कसे फेडेल. एकमेकांना बघितले नाही, पण देव जो अदृश्यपणे किंवा वर्दीत येऊन मदत कसा करतो हे बघितले. त्यांना सॅल्यूट आणि मनाचा मुजरा.

    (शिवानी दाणी वाखरे यांच्या फेसबुक वॉलवरून)

    How to bring students from Manipur read its reality

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस