विशेष प्रतिनिधी
इचलकरंजी : Asaduddin Owaisi : पाकिस्तानसोबत व्यापार, पाणी, विमान व जहाज वाहतूक बंद केली असताना क्रिकेट सामना खेळून काय साध्य केले? क्रिकेट न खेळता जगाला एक वेगळा संदेश देता आला असता. मात्र, ते आपण गमावून बसलो. नेते क्रिकेटची तुलना सैन्यांसोबत करीत आहेत, हे कितपत योग्य आहे, अशी टीका एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
कोल्हापूर नाक्याजवळ असलेल्या मैदानात झालेल्या सभेत ओवेसी बाेलत हाेते. भडकाऊ भाषण करू नये, अशी नोटीस ओवेसी यांना पोलिसांनी बजावली. पोलिसांनी लव्ह लेटर दिल्याचे सांगत असताना मी चारवेळा खासदार आणि दोनवेळा आमदार राहिलो आहे. कायद्याचे मला ज्ञान आहे. असे असताना मला नोटीस देण्यात आली. यावरून पोलिसांचा खुजेपणा दिसून येतो, अशी टीका त्यांनी केली.
ओवेसी म्हणाले, भारतीय खेळाडूंबद्दल आमच्या मनात कोणताही संदेह नाही. आम्ही इंग्लंडला हरवू शकतो, तर पाकिस्तान संघ खूप चिल्लर आहे. त्यांच्यासोबत खेळलो नसतो, तर नुकसान त्यांचे झाले असते, आपले नाही. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून भाजपचे राष्ट्रवादाचे पितळ उघडे पडले आहे.
प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे करण्याचे बंद करावेत. पाहिजे असेल तर नुकसान झालेल्या गावांची माहिती आम्ही आणून देऊ; पण पूरग्रस्तांना तत्काळ मदत करा. दुसऱ्या पक्षात गुलाम असलेल्या आपल्या लोकांना परत येऊ देऊ नका. त्यांची चाल आम्ही ओळखतो.
कोल्हापुरात येण्यास विरोध करणाऱ्या संघटनांचा समाचार जलिल यांनी आपल्या भाषणात घेतला. कोल्हापूर कुणाची जहागिरी नाही. मी कोल्हापूर आणि इचलकरंजीत आलो आहे आणि येथे ठाम उभारलो आहे असे सांगितले.
How right is it to compare cricket with the army? Asaduddin Owaisi questions
महत्वाच्या बातम्या
- Prime Minister Modi : मैदानावरही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच – भारत विजयी, पंतप्रधान मोदींनी केले भारतीय संघाचे कौतुक
- Owaisi Rally : बिहारमध्ये ओवैसींच्या रॅलीत ‘आय लव्ह मोहम्मद’चे पोस्टर्स; म्हणाले – आपल्या हक्कांसाठी राजकीय नेतृत्व मजबूत करावे लागेल
- BJP Retaliates : मातोश्रीचे खिसे झटका, किमान 20 हजार कोटी शेतकऱ्यांना द्या; भाजपचा ठाकरे गटावर पलटवार
- रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी महापुरात गेली वाहून; गोदावरी महाआरतीची उज्ज्वल परंपरा मात्र कायम!!