विशेष प्रतिनिधी
पुणे : एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी अजून कितीजणांचे बळी घेणार आहात, असा सवाल राज्य सरकारला केला आहे. तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. How many more students will be victimized; Statewide agitation warning
स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी पुण्यात दीप मौन आंदोलन केले. त्या नंतर ते बोलत होते.
- पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थांचे मूक आंदोलन
- दोन वर्षे झाली विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतिक्षेत
- अजून किती विद्यार्थ्यांचे बळी घेणार
- ठोस निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू
- तर २५ लाख विद्यार्थी उतरणार रस्त्यावर
- सरकारने आता वेळकाढूपणा करू नये
- विद्यार्थांच्या संयमाची परीक्षा पाहू नका
- एल्गारसारखे आंदोलन करण्याचा इशारा