• Download App
    रेमडेसिव्हिर, टोसिलीझुमॅबसारखी औषधे राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटींनाच कशी मिळतात? - उच्च न्यायालयाचा सवाल।How can medicines get to politicians and actors

    रेमडेसिव्हिर, टोसिलीझुमॅबसारखी औषधे राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटींनाच कशी मिळतात? – उच्च न्यायालयाचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रेमडेसिव्हिर, टोसिलीझुमॅब आणि अन्य औषधांचा पुरेसा साठा राज्य सरकारकडे उपलब्ध नाही; मग राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रिटींना ही औषधे कशी मिळतात? असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला केला. How can medicines get to politicians and actors

    कोरोना प्रतिबंधक आरोग्य व्यवस्थेबाबत करण्यात आलेल्या विविध जनहित याचिकांवर दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्यात रोज सुमारे ७० हजार रेमडेसिव्हिरची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडून केवळ ४५ हजार इंजेक्शनचा पुरवठा होतो आहे, असे सरकारी वकील अक्षय शिंदे यांनी खंडपीठाला सांगितले. यावर रेमडेसिव्हिरचा पुरेसा पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने का नाही घेतली? असा प्रश्न न्यायालयाने केला आहे. केंद्र सरकारकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी त्याचे खंडन केले.



    रेमडेसिव्हिर आणि टोसिलीझुमॅबचा पुरेसा साठा राज्य सरकारकडे नाही; मात्र समाजमाध्यमावर याबाबत राजकारणी व सेलिब्रिटींना विनंती केल्यास त्यांना ती तत्काळ उपलब्ध होतात, असे याचिकादारांकडून ॲड. राजेश इनामदार यांनी सांगितले. सरकारला औषधे मिळणे बंधनकारक असताना खासगी व्यक्तीला कसे मिळते? असा सवाल न्यायाधीशांनी केला. टोसिलीझुमॅब हे औषध सरकारकडे ४ मेपासून आलेले नाही; पण एका अभिनेत्याकडून ते लोकांना मिळत आहे. दुसरीकडे रुग्णालयात औषधे नाहीत असे बोर्ड लागले आहेत, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. औषधांमध्ये भेसळ होत असल्याची तक्रारही याचिकादारांकडून करण्यात आली. यावर राज्य आणि केंद्र सरकारला खुलासा करण्याचे निर्देश देत कायदा राखण्यासाठी आम्ही आहोत, असे खंडपीठाने सुनावले. या याचिकेवर पुढील सुनावणी १९ मे रोजी होणार आहे.

    How can medicines get to politicians and actors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bombay Stock : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत उडवून देण्याची धमकी, चार आरडीएक्स बाँब ठेवल्याचा मेल

    जयंत पाटलांचा “अडथळा” सरताच पवारांच्या घरातच पदांची वाटणी; मुख्य सचिव पदी रोहित पवारांची वर्णी; अख्खी राष्ट्रवादी पवार कुटुंबाच्या सावटाखाली!!

    राज ठाकरेंचा सावध पवित्रा, पण राज बरोबर आल्याचा उद्धव ठाकरेच लावताहेत धोषा!!