विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने प्रशासनाने काही निर्बंध शिथिल केले आहेत. शहरातील हॉटेल्स सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. Hotels in Pune will remain open till 7 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर वाढल्यावर पुण्यातील हॉटेल बंद करण्यात आली होती.केवळ घरपोहोच सेवा उपलब्ध करून दिली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर 5 जून रोजी हॉटेल चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र याला हॉटेल मालकांचा विरोध होत होता .हॉटेल चालविणे परवडत नव्हते.त्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती.
Hotels in Pune will remain open till 7 pm
महत्त्वाच्या बातम्या
- Tokyo Olympics : मीराबाई चानूने भारतासाठी जिंकले पहिले मेडल, वेटलिफ्टिंग मध्ये सिल्व्हरची कमाई
- शहरी नक्षलवादी आरोपींना जामीन देण्यास ठाकरे – पवार सरकारचा न्यायालयात विरोध
- Pegasus Effect; की अजब तर्कट??; सरकारी कर्मचाऱ्यांवर मोबाईल कमी वापरण्याचे ठाकरे – पवार सरकारचे बंधन
- बोगस मतदान तातडीने रोखण्याची गरज, सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त
- ट्विटर इंडियाच्या एमडींना न्यायालायाचा दिलासा, उत्तर प्रदेश पोलिसांवर कडक ताशेरे