• Download App
    भीषण अपघात; सप्तशृंगी गड घाटातून प्रवासी बस दरीत कोसळली! Horrific accident at Saptashringi Gadh Ghat The bus fell straight into a 400 feet deep gorge

    भीषण अपघात; सप्तशृंगी गड घाटातून प्रवासी बस दरीत कोसळली!

    १५ जण गंभीर जखमी झाले असून सहा जणांची  प्रकृती चिंताजनक आहे.

    विशेष प्रतिनिधी

    वणी : नाशिकमधील सप्तश्रृंगी गड घाटतून एक प्रवासी बस थेट जवळपास ४०० फूट दरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे. प्राप्त माहितीनुसार या बसमध्ये एकूण ३२ प्रवासी होते, त्यातील एक प्रवासी महिलेचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. यापैकी  सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. Horrific accident at Saptashringi Gadh Ghat The bus fell straight into a 400 feet deep gorge

    जखमींना वणी ग्रामीण रूग्णालयात तातडीने हलवण्यात आले. राज्य परिवहन महमंडळाची बुलढाणा येथील खामगाव आगाराची बस मंगळवारी सप्तश्रृंगी गडावर रात्री उशीरा आली होती आणि बुधवारी सकाळी ती परतीच्या प्रवासाला निघाली होती.  दरम्यान घाटात एक वळणावर बस चालकाला अंदाज न आल्याने बस थेट दरीत कोसळली आणि भीषण अपघात घडला. अपघातचे वृत्त समजताच स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि पोलीस प्रशासनही दाखल झाले व बचवाकार्य सुरू झाले.

    नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड घाटात एस. टी. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे, तर या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

    Horrific accident at Saptashringi Gadh Ghat The bus fell straight into a 400 feet deep gorge

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ