विशेष प्रतिनिधी
वर्धा : वर्ध्याच्या सेलसुरामध्ये कारचा भीषण अपघात झाला आहे. यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.Horrible car accident in the middle
हे सर्व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे पार्टीसाठी ते देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून कोसळली सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्यानं वर्ध्याकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्रीस आणण्यात आले आहेत. सातही विद्यार्थी दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Horrible car accident in the middle
महत्त्वाच्या बातम्या
- शासकीय वसतीगृहाचा वापर तात्पुरत्या कारागृहासाठी
- महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड पंतप्रधानांनी बालकांशी संवाद साधला
- सहकार सम्राटांविरुध्द अण्णा हजारे यांचा एल्गार, सहकार साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, अमित शहांना लिहिले पत्र
- पेण : शिर्की चाळ नंबर 2 येथील सागरवाडीत शॉर्टसर्कीटमुळे आग , संपूर्ण घर जळून खाक