• Download App
    समलिंगी दांपत्याची करवा चौथची जाहिरात मागे घ्यावी लागणे सार्वजनिक असहिष्णुता, न्या. धनंजय चंद्रचूड यांचे मत|Homosexual couple's Karwa Chauth advertisement to be withdrawn is Public intolerance, Justice Dhananjay Chandrachuds Opinion

    समलिंगी दांपत्याची करवा चौथची जाहिरात मागे घ्यावी लागणे सार्वजनिक असहिष्णुता, न्या. धनंजय चंद्रचूड यांचे मत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: समलिंगी दांपत्याच्या करवा चौथची डाबरची जाहिरात त सार्वजनिक असहिष्णुतेमुळे मागे घ्यावी लागली. सामाजिक असमानता नष्ट करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले कायदे आणि समाजातली परिस्थिती यामध्ये बरीच दरी असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंदचूड यांनी व्यकत केले आहे.Homosexual couple’s Karwa Chauth advertisement to be withdrawn is Public intolerance, Justice Dhananjay Chandrachuds Opinion

    डाबर कंपनीने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेली करवा चौथची जाहिरात मागे घेण्यात आली. या जाहिरातीमध्ये समलिंगी दाम्पत्य करवा चौथ हा सण साजरा करत असल्याचे दाखवण्यात आले होते. याबाबत कायदेशीर जागृतीद्वारे महिला सक्षमीकरण या विषयावर बोलताना न्या. चंद्रचूड म्हणाले, आपले संविधान काळानुरूप बदलणारं आहे.



    यामध्ये पितृसत्ताक पद्धतीमध्ये असणारी असमानता दूर करण्यासाठीचे उपाय दिले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी, त्यांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानाला आणि समानतेला सामाजिक पुष्टी देण्यासाठी संविधान हे शक्तिशाली साधन आहे.

    महिलांच्या घटनात्मक अधिकारांची पूर्तता करण्यासाठी घरगुती हिंसाचार कायदा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा यांसारखे कायदे तयार करण्यात आले आहेत; मात्र सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करताना महिलांवर अन्याय करणारी बरीच प्रकरणं आमच्यासमोर येतात. सामाजिक असमानता नष्ट करण्यासाठी बनवलेले कायदे आणि समाजाची सध्याची परिस्थिती यामध्ये एक मोठी दरी आहे, हे त्यातून दिसून येते.

    या वेळी त्यांनी कायदे आणि परिस्थिती यामधील अंतर दाखवण्यासाठी काही उदाहरणंही दिली. ते म्हणाले, ‘आम्ही अशी बरीच प्रकरणं पाहिली आहेत, जिथे कायदेशीररीत्या कारवाई पुरेशी नसते. एका महिलेला कंपनीने मॅटर्निटी लीव्ह नाकारली. कारण तिच्या पतीला पहिल्या पत्नीपासून झालेली दोन मुलं त्यांच्या कुटुंबात होती.

    आताचं बाळ म्हणजे तिचं पहिलं बाळ हे घरातलं तिसरं मूल असल्याकारणाने तिला तिचा हक्क मिळवता आला नाही. कित्येक वेळा घटस्फोटानंतर महिलेने पोटगीसाठी अर्ज केल्यावर तिच्या पतीचा बिझनेस हा खरं तर त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे आणि तिचा पती हा मालक नसून पगारावर काम करणारा कर्मचारी असल्याचं सांगण्यात येते.

    यामुळे एक तर तिला पोटगी नाकारण्यात येते किंवा मग अगदीच कमी मिळते. अगदी दोन दिवसांपूर्वीच केवळ लोकांच्या रोषामुळे एका कंपनीला त्यांची जाहिरात मागे घ्यावी लागली होती, ज्यामध्ये त्यांनी समलिंगी जोडपं दाखवलं होतं..

    Homosexual couple’s Karwa Chauth advertisement to be withdrawn is Public intolerance, Justice Dhananjay Chandrachuds Opinion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!