• Download App
    दंगलीमागे रझा अकादमीच आहे की आणखी कोण आताच सांगू शकत नाही - गृहमंत्री वळसे पाटील । Home minister Walse Palil Says, I Cant Tell You Today But We Will Probe Be It Raza Academy Or Other

    दंगलीमागे रझा अकादमीच आहे की आणखी कोण आताच सांगू शकत नाही – गृहमंत्री वळसे पाटील

    त्रिपुरामधील कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यातील अनेक शहरांत रझा अकादमीने पत्रके लावून मोर्चे काढले. यात अनेक ठिकाणी मोर्चांदरम्यान हिंसाचार उसळला. दगडफेक झाली, अनेक जण जखमी झाले. महाराष्ट्र अशांत झाला. एवढे सगळे होऊनही राज्याचे गृहमंत्री मात्र यामागे रझा अकादमी आहे की नाही, हे अद्याप सांगू शकले नाहीत. Home minister Walse Palil Says, I Cant Tell You Today But We Will Probe Be It Raza Academy Or Other


    वृत्तसंस्था

    मुंबई : त्रिपुरामधील कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यातील अनेक शहरांत रझा अकादमीने पत्रके लावून मोर्चे काढले. यात अनेक ठिकाणी मोर्चांदरम्यान हिंसाचार उसळला. दगडफेक झाली, अनेक जण जखमी झाले. महाराष्ट्र अशांत झाला. एवढे सगळे होऊनही राज्याचे गृहमंत्री मात्र यामागे रझा अकादमी आहे की नाही, हे अद्याप सांगू शकले नाहीत.

    वृत्तसंस्था एएनआयने गृहमंत्री वळसे पाटील यांना विचारले की, रझा अकादमीविरुद्ध काही कारवाई होणार का? यावर ते म्हणाले की, मी तुम्हाला आजच याबद्दल काहीही ठाम सांगू शकत नाही. पण आम्ही याची चौकशी करू. मग ती रझा अकादमी असो की आणखी कोणतीही संघटना असो, त्यांच्या मोर्चामागच्या उद्देशाची चौकशी होईल.

    ते असेही म्हणाले की, आम्ही नक्कीच याचा तपास करू. त्रिपुरात जी घटना घडली अथवा घडली नाही, त्यावरून महाराष्ट्रात निघालेल्या मोर्चांची चौकशी करू. यादरम्यान झालेल्या नुकसानीचीही माहिती गोळा केली जात आहे. आणखी अहवाल प्राप्त झाल्यावर मी तुम्हाला याबाबत अधिक माहिती देईन.

    दरम्यान, मोर्चांमध्ये दिसलेले पोस्टर्स रझा अकादमीचेच होते, त्या पोस्टर्सवरूनच या हिंसेमागे रझा अकादमी असल्याचा आरोप होत आहे. राज्यात ठिकठिकाणी निर्माण झालेल्या तणावाला रझा अकादमीच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री मात्र रझा अकादमीविरुद्ध कारवाईला का बिचकत आहेत, असा सवाल आता केला जात आहे. नवाब मलिकांनीही दोषींविरुद्ध कारवाई व्हावी असे म्हटले आहे, परंतु त्यांनी या सर्वाचे खापर वसीम रिझवींवर फोडले आहे. रिझवींच्या कथित पुस्तकामुळे या सर्व गोष्टी घडल्याचा आरोप आहे. परंतु राज्यात एकाच वेळी वेगवेगळ्या शहरांमध्ये उसळलेला हिंसाचार हा निश्चित सुनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    दुसरीकडे, खा. संजय राऊत यांनी मात्र यासाठी विरोधी पक्षांनाच जबाबदार धरले आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे, सरकार पाडण्याचे कारस्थान म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. कहर म्हणजे, ज्या घटनेवरून महाराष्ट्रात हिंसाचार उसळला प्रत्यक्षात त्या त्रिपुरात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे आता समोर आले आहे. फेक पोस्टमुळे हा सर्व प्रकार घडला असून यामुळे विनाकारण सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. रझा अकादमीने मोर्चे काढण्याआधी या पोस्ट आणि प्रत्यक्ष घटना तपासल्या होत्या का, त्यांचा खरा उद्देश काय होता, या बाबींचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आता राज्य सरकार या गंभीर प्रकरणी काय भूमिका घेतं, याकडेच सर्वांचं लक्ष लागले आहे.

    Home minister Walse Palil Says, I Cant Tell You Today But We Will Probe Be It Raza Academy Or Other

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!

    सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये; राज आणि उद्धव हजर, पण पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र गैरहजर, बैठकीचे महत्त्व राहिलेच काय??

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण