• Download App
    गृहमंत्री वळसे पटलांनी दिले निर्देश ; म्हणाले - महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली लवकरात लवकर जाहीर कराHome Minister Valse Patel gave instructions; Said - Announce guidelines for women's safety as soon as possible

    गृहमंत्री वळसे पटलांनी दिले निर्देश ; म्हणाले – महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली लवकरात लवकर जाहीर करा

    मार्गदर्शक नियमावलीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी अशा सूचनाही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या.Home Minister Valse Patel gave instructions; Said – Announce guidelines for women’s safety as soon as possible


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आपण पाहतो विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महिला नोकरी करीत आहेत. या सर्व महिलांची सुरक्षा हा राज्य शासनाच्या दृष्टीने महत्वाचा विषय असून गृह विभागाने यासंबधीत सर्वसमावेशक मार्गदर्शक नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

    राज्यातील माहिती तंत्रज्ञान प्रकल्प असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच मार्गदर्शक नियमावलीबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी अशा सूचनाही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या.



    महिला विविध क्षेत्रात कामाच्या निमित्ताने रात्री उशीरापर्यंत बाहेर असतात.त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विभागाच्या नियमांचे तसेच वेळोवेळी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीचा अभ्यास करून गृह विभागाने लवकरात लवकर मार्गदर्शक तत्वे तयार करावीत.

    तसेच यावेळी प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर मुख्य सचिव, गृह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    Home Minister Valse Patel gave instructions; Said – Announce guidelines for women’s safety as soon as possible

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!