• Download App
    आम्ही ज्याला मते दिली तोच जिंकेल, असे सांगून हितेंद्र ठाकूरांनी वाढविले दोन्ही बाजूंचे ब्लडप्रेशर!!Hitendra Thakur raises blood pressure on both sides

    आम्ही ज्याला मते दिली तोच जिंकेल, असे सांगून हितेंद्र ठाकूरांनी वाढविले दोन्ही बाजूंचे ब्लडप्रेशर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात चुरशीच्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. अटीतटीची ही लढाई कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे मत हे निर्णायक असल्याचे म्हटले जात आहे. Hitendra Thakur raises blood pressure on both sides

    त्यामुळे मतदानानंतर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ज्याला मते दिली तोच उमेदवार निवडून येणार, असा विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. पण हितेंद्र ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही बाजूंचे ब्लडप्रेशर वाढले आहे.

    आपण कोणाला मत दिले हे कधीही सांगायचे नसत. त्यामुळे मी सुद्धा कोणाला मत दिले ते सांगणार नाही. पण आम्ही ज्याला मते दिलीत तोच उमेदवार निवडून येईल, थोड्याच वेळात तुम्हाला ते कळेल, अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे आता या निकालाची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

    विभागाचा विकास महत्वाचा

    माझ्या विभागाची कामे ही माझ्यासाठी महत्वाची असतात. हे भल्याभल्या नेत्यांना माहिती आहे, त्यामुळे फार काही बोलायची आवश्यकता नाही. आणि विभागाचा विकास होणारच, असा विश्वासही हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

    Hitendra Thakur raises blood pressure on both sides

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!