• Download App
    Indrajit Sawant इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण;

    Indrajit Sawant : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण; प्रशांत कोरटकरला कोर्टाचा 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा

    Indrajit Sawant

    प्रतिनिधी

    कोल्हापूर : Indrajit Sawant  छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर मंगळवारी कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. कोरटकरला प्रत्यक्ष हजर ठेवावे की नाही यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार आता प्रशांत कोरटकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे. आता 17 मार्चपासून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीत कोरटकरला प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.Indrajit Sawant

    कोरटकर जामीन प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार झालेल्या सुनावणीत मंगळवारी ॲड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्यांविषयी तातडीने कारवाई व्हावी. कोरटकरने पत्नीच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट करून स्वतःचा मोबाईल पोलिसांच्या हवाली केला, असा दावा सावंतांचे वकील ॲड. असीम सरोदेंनी केला आहे. कोरटकरच्या वकिलांनी तो खोडून काढला आहे.



    कोरटकरला तात्काळ अटक करा- सरोदे

    दरम्यान वकील असीम सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर हा विषारी माणूस आहे त्याला तात्काळ अटक करण्यात आली पाहिजे. मी जेवढे त्याला ओळखतो तितका सावंत यांना धमकी देणारा आवाज त्याचाच आहे. मोबाइल देताना त्यामधील डाटा डिलीट करण्यात आला आहे. हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे.

    असीम सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर नावाच्या तथाकथित पत्रकाराने भ्रष्ट मार्गाने बऱ्याच गोष्टी केल्या आहेत, हे पुढे आले आहे. तो ज्या विचारधारेशी निगडीत आहे, तसे त्यांने इंद्रजित सावंत यांना फोन करत बोलले. ते रेकॉर्ड व्हायरल झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे वक्तव्ये त्याने केले आहेत.

    असीम सरोदे म्हणाले की, कोरटकरने सावंत यांना फोन करत जे वक्तव्य केले आहे ते जर पाहिले तर भयानक स्वरुपाचे आहेत, तरी अर्ध्या तासात त्याला अटकपूर्व जामीन मिळतो कसा? सरकारनेदेखील अर्ज केला होता की त्याचा जामीन रद्द करा. ज्या अटींवर त्याला जामीन मिळाला होता त्यातील अनेक गोष्टीचे त्याने पालन केल नाही म्हणून त्याचा जामीन रद्द करण्यात यावा. कोल्हापूरच्या पोलिस स्टेशनला हजर होणे ही त्यातील पहिली अट होती पण कोरटकर हजर झाला नाही. तर दुसरी अट होती की पोलिस स्टेशनला मोबाईल जमा करावा पण त्याने पत्नीच्या हाती मोबाइल पाठवला.

    नेमके प्रकरण काय?

    छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राxx धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत. पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे, असे सावंत यांनी म्हटले होते.

    इंद्रजित सावंत यांनी छावा चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधताना कथितपणे ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रशांत कोरटकर नामक नागपूरच्या व्यक्तीने फोन करून त्यांना धमकी दिली आहे. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः यासंबंधीची ऑडिओ क्लिप जाहीर करत तसा दावा केला आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    History scholar Indrajit Sawant threat case; Court grants relief from arrest to Prashant Koratkar till March 17

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!