विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला 5.78 लाख एकर सिंचनलाभ
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Tapti Mega Recharge मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली भोपाळ, मध्य प्रदेश येथे ‘संयुक्त सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी महाराष्ट्र – मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची 28वी बैठक’ पार पडली. याप्रसंगी दोन्ही मुख्यमंत्री यांनी ‘ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा’संदर्भात महाराष्ट्र – मध्य प्रदेश सरकारमधील ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.Tapti Mega Recharge
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस आहे. 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या नेतृत्वात देशात पाण्याच्या संदर्भातील आंतरराज्यीय पाणी करारांबाबतच्या कामांना गती मिळाली. त्याचाच परिणाम म्हणून, 25 वर्षांनंतर महाराष्ट्र – मध्य प्रदेश आंतरराज्यीय मंडळाची बैठक आज पार पडली.” या ‘ताप्ती बेसिन मेगा रिचार्जयोजने’ संदर्भातील सामंजस्य कराराला अभूतपूर्व गती दिल्याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे त्यांनी आभार मानले.
या मेगा रिचार्ज योजनेचा दोन्ही राज्यांना मोठा फायदा होणार आहे. मध्य प्रदेशातील 1,23,082 हेक्टर आणि महाराष्ट्रातील 2,34,706 हेक्टर जमिनीला सिंचन यामुळे प्राप्त होईल. याशिवाय, महाराष्ट्रातील अकोला, बुलढाणा आणि अमरावती यासारख्या खारपाण पट्टा असणाऱ्या जिल्ह्यांना याचा विशेष फायदा होईल आणि तेथील पिण्याच्या पाण्याची समस्याही कायमची सुटेल. यासंदर्भात दोन्ही राज्ये या प्रकल्पाबाबत केंद्र सरकारला ‘केन-बेतवा आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पा’ला केंद्र जे सहकार्य देते ते मिळावे, यासाठी विनंती करणार असल्याचेही, मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
या बैठकीत महाराष्ट्राचे मुद्दे मांडले. त्यात डांगुर्ली बॅरेज, जामघाट असे महत्त्वाचे मुद्दे होते. या जामघाट प्रकल्पासाठी 28 वर्षांपूर्वी मी मध्यप्रदेशात तत्कालिन मुख्यमंत्र्यांसोबत आलो होतो. पण, आता त्यालाही गती मिळते आहे, याचा आनंद आहे. या जामघाटमुळे नागपूर शहरासाठी पुढच्या 30-40 वर्षांसाठी पाणी मिळणार आहे. आता ऑक्टोबरमध्ये पुढची बैठक घेण्यात येईल. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश कोणत्या क्षेत्रात एकत्रित काम करु शकते, यादृष्टीने सुद्धा अनेक बाबींवर यावेळी चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
Historic agreement between Maharashtra and Madhya Pradesh regarding Tapti Mega Recharge Project
महत्वाच्या बातम्या
- Colonel Sophia कर्नल सोफिया म्हणाल्या- पाकिस्तान नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतोय; 400 ड्रोन उडवले
- BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय
- Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!
- Nishikant Dubey : सुप्रीम कोर्टाने म्हटले- निशीकांत दुबे यांचे विधान बेजबाबदार; आम्ही फुले नाही जी अशा विधानांनी कोमेजतील