• Download App
    पुणे जिल्ह्यातील हिरडा खरेदी करा; आदिवासी महामंडळाला गृहमंत्री दिलीप वळसे यांची सूचना|Hirda in Pune District; Home Minister Dilip Walse's instruction to the Tribal corporation

    पुणे जिल्ह्यातील हिरडा खरेदी करा; आदिवासी महामंडळाला गृहमंत्री दिलीप वळसे यांची सूचना

    वृत्तसंस्था

    घोडेगाव : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील आदिवासी क्षेत्रात तयार होणारा हिरडा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरड्याचा हमीभाव निश्चित करून महामंडळाने हिरडा खरेदी सुरू करावी, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत दिले.Hirda in Pune District; Home Minister Dilip Walse’s instruction to the Tribal corporation

    आदिवासी भागासाठी काम करणारा एकात्मिक आदिवासी विकास विभाग व आदिवासी विकास महामंडळ यांच्याकडील हिरडा खरेदी, खावटी वाटप, शबरी आवास योजना, वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी, ठक्कर बाप्पा योजना अशा अनेक प्रश्नांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,



    आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस समाज कल्याणचे माजी सभापती सुभाषराव मोरमारे, आंबेगाव पंचायत समिती सभापती संजय गवारी, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले,

    आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, सहसचिव सु.न.शिंदे, एल.के.डोके, उपसचिव रविंद्र औटी, सह आयुक्त विकास पानसरे, अप्पर आयुक्त गिरीष सरोदे, कार्यकारी संचालक नितीन पाटील, प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे, विस्तार अधिकारी नवनाथ भवारी उपस्थित होते.

    Hirda in Pune District; Home Minister Dilip Walse’s instruction to the Tribal corporation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!