नाशिक : हिंजवडीचं लवासा झालाय का??, असा सवाल विचारायची वेळ पुतण्याने काढलेल्या काकांच्या विकासाच्या दृष्टीच्या वाभाड्यांमुळेच समोर आली.Hinjewadi and lavasa, same example of lack of proper planning and execution
प्रचंड पाऊस आणि आपत्ती निवारण नियोजनाचा बट्ट्याबोळ यामुळे हिंजवडीची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे 6.00 वाजताच हिंजवडीत पोहोचले. तिथे त्यांनी सरपंचांना सकट सगळ्यांना झापले. आपलं वाटोळ झालंय. इथला आयटी पार्क हैदराबाद आणि बंगलोरला चाललाय. आपण वेळीच सुधारणा केली नाही, तर काही खरं नाही. हिंजवडीतली सगळी अनधिकृत कामे पाडायलाच पाहिजेत. वाहतुकीसाठी अडथळा ठरणारी मंदिरे देखील पाडायला पाहिजेत. धरणाच्या पाण्यातही मंदिरे जातातच ना!!, मग इथे वाहतुकीच्या अडथळ्याला कारणीभूत ठरणारी मंदिरे कशासाठी ठेवायची??, असा सवाल त्यांनी केला. अनधिकृत बांधकामे पाडताना कुणीही आडवा आला, तरी त्याच्यावर 353 कलम लावून कारवाई करा. अजिबात कुणालाही सोडू नका. अगदी अजित पवार जरी आडवा आला, तरी त्याच्यावर 353 कलम लावून कठोर कारवाई करा. कोणत्याही स्थितीत हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करा. इथली कामे चांगली करा, असे आदेशच अजितदादांनी अधिकाऱ्यांना सगळ्यांसमोर दिले.
त्यामुळे मूळात हिंजवडीतली अनधिकृत बांधकामे आहेत कुणाची आणि ती केलीत कुणी??, असा असा सवाल समोर आला. मूळात अजित पवारांना 353 खाली कारवाई करा, हे सांगावे लागले. त्यात खुद्द अजित पवार जरी आडवा आला तरी त्याच्यावर 353 कलमाद्वारेच कारवाई करा, हे म्हणावे लागले. याचा अर्थच हिंजवडीतली अनधिकृत बांधकामे बहुतांश अनधिकृत बांधकामे ही अजितदादा आणि राष्ट्रवादी संस्कारित लोकांचीच असल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई सुरू झाली, तर हेच राष्ट्रवादी संस्कारित त्यामध्ये आडवे पडून प्रतिबंध घालतात हेही उघड झाले. म्हणून तर अजितदादांना खुद्द अजित पवार जरी आडवा आला, तरी त्याच्यावर 353 कलम लावा हे सांगावे लागले.
शरद पवारांची भलामण
एरवी याच राष्ट्रवादी संस्कारितांनी शरद पवार साहेबांनी हिंजवडीचा विकास केला, इथे आयटी पार्क आणले, याची भलामण केली. हिंजवडी सारख्या दुष्काळी गावला कुणी विचारत नव्हते. हिंजवडीतल्या पाणीटंचाईमुळे गावातल्या मुलांना कोणी लग्नासाठी मुली पण देत नव्हते. पवार साहेबांनी हिंजवडीचा विकास घडवून इथे मोठा बदल केला. इथल्या जमिनींना सोन्याचे भाव आले. त्यातले सगळे आर्थिक आणि राजकीय लाभ राष्ट्रवादी संस्कारितांनाच मिळाले. पण हे सगळे टिकवून ठेवणे त्यांना जमले नाही.
हिंजवडीच्या विकासाचे वाभाडे
हिंजवडीच्या विकासाचे नियोजन काळाशी सुसंगत टिकले नाही. किंबहुना ते काळाच्या कसोटीवर अपुरे पडले हे गेल्या दोन-तीन वर्षांमधल्या वेगवेगळ्या समस्यांमधून समोर आले. थोडा पाऊस पडला, तरी हिंजवडीचे रस्ते नद्यांसारखे वाहू लागले. वाहतुकीची कोंडी प्रचंड व्हायला लागली. इथल्या समस्यांनी अक्राळ विक्राळ धारण केल्याबरोबर प्रोफेशनली चालवल्या जाणाऱ्या इथल्या आयटी कंपन्या इथून उठून दुसऱ्या राज्यांमध्ये निघून जाऊ लागल्या अगदी त्यामध्ये इन्फोसिसचा देखील समावेश झाला. त्यानंतर पालकमंत्री असलेल्या अजितदादांना जाग आली. म्हणूनच त्यांनी आक्रमक शैलीत अजित पवार जरी आडवा आला तरी त्याला 353 कलम लावून कठोर कारवाई करा पण हिंजवडीतली सगळी कामे चांगली करा वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनधिकृत बांधकामे पाडा, असे आदेश दिले.
लवासाचे स्वप्न आणि उद्ध्वस्त वास्तव
हे काहीसे लवासा लेक सिटी प्रकल्पसारखेच झाले. लवासा प्रकल्प सुरू झाला, त्यावेळी असाच गाजावाजा करण्यात आला होता. साहेबांच्या स्वप्नातली रम्यनगरी असे तिचे वर्णन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षामध्ये पर्यावरणाची हानी करून तो प्रकल्प उभारला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टापासून ते सर्व पातळ्यांवरच्या प्रशासनापर्यंत सगळीकडून तो प्रकल्प अडचणीत आला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने त्यामध्ये मेख मारून ठेवली. शरद पवार यांच्या तथाकथित नियोजनाचे पितळ उघडे पडले आणि त्याच वेळी त्यातला भ्रष्टाचार देखील बाहेर आला. शेवटी पवार आणि त्यांच्या समर्थकांना किंबहुना कुटुंबीयांना लवासा उभारणीच्या कंपनीतून हळूहळू बाहेर पडावे लागले. हे प्रकरण राजकीय दृष्ट्या आपल्यावर शेकू नये यासाठी वरपासून खालपर्यंत “वेगवेगळी पेरणी” करावी लागली. शरद पवारांच्या स्वप्नातला लवासा प्रकल्प हा भ्रष्टाचाराचे प्रतीक बनला. त्यांना त्याचा राजकीय फटका बसला, पण मोदी सरकारी कृपेमुळे फक्त कायदेशीर फटका बसायचा राहिला. पण लवासा प्रकल्प पूर्ण डब्यात गेला. तिथली हाय प्रोफाइल म्हणून बांधलेली घरे, अख्खीच्या अख्खी पावसाच्या फटक्यामुळे जमिनीत धसली. पवारांची विकासाची दृष्टी किती कोती + छोटी आणि खोटी आहे हेच लवासा प्रकल्प पूर्ण फासल्यामुळे सिद्ध झाले.
काकांच्या विकासाच्या दृष्टीचे वाभाडे
अजित पवार यांना आपलं वाटोळं झालंय. हिंजवडीतले आयटी उद्योग निघून चाललेत अनधिकृत बांधकामे पाडा अजित पवार आडवा आला, तरी त्याच्यावर 353 कलम लावून कारवाई करा, असे सांगावे लागले. यातूनच हिंजवडी आयटी पार्क मधले पवारांचे नियोजन काळाच्या कसोटीवर तोकडे पडल्याचे सिद्ध झाले. काकांच्या तथाकथित विकासाच्या दृष्टीचे आणि नियोजनाचे पुतण्यानेच पुरते वाभाडे काढले.
Hinjewadi and lavasa, same example of lack of proper planning and execution
महत्वाच्या बातम्या
- कम्युनिस्टांना गाझाचा कळवळा, उच्च न्यायालयाने खडसावत म्हटले देशाच्या प्रश्नांवर बोला!
- Anjali Damania : धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत, पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू
- राहुल गांधी म्हणाले, मोदींमध्ये काही दम नाही; मग काँग्रेसवाले मोदींना हरविण्याऐवजी त्यांच्या रिटायरमेंटची का वाट बघताहेत??