Hindustani Bhau : सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ याला मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. धारावीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनप्रकरणी विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी याला अटक करण्यात आली होती. धारावी पोलिसांनी त्याला 1 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. Hindustani Bhau granted bail by Mumbai Session Court in student agitation Case
वृत्तसंस्था
मुंबई : सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ याला मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. धारावीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनप्रकरणी विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी याला अटक करण्यात आली होती. धारावी पोलिसांनी त्याला 1 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.
जानेवारीच्या अखेरीस धारावी आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये इयत्ता 10वी आणि 12वीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. ऑफलाइन परीक्षेला विरोध करत त्यांनी रस्त्यावरच गोंधळ घातला होता. विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ याने विद्यार्थ्यांना भडकावले, चिथावणी दिली, असा आरोप करण्यात आला होता. या चिथावणीखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन करत काही वाहनांची तोडफोड केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विकास फाटक म्हणाला होता की, या दोन वर्षांत कोविडमुळे अनेकांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत कुटुंबे या धक्क्यातून सावरत आहेत आणि आता ओमिक्रॉनचे नवीन नाटक सुरू झाले आहे. हे काय आहे? सरकार लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा का द्यावी? परीक्षा रद्द करा असे हिंदुस्थानी भाऊ यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हणाला. मुलांच्या जिवाशी खेळू नका अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल. परीक्षा रद्द करा, अशी भाषा त्याने वापरली होती.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धारावी पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले होते. हा व्हिडिओ 24 जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला होता आणि विकास फाटकच्या अटकेच्या वेळी त्याला 2.77 लाख व्ह्यूज मिळाले होते. विकासचे यूट्यूब चॅनलवर 5 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
Hindustani Bhau granted bail by Mumbai Session Court in student agitation Case
महत्त्वाच्या बातम्या
- मकाई साखर कारखान्याकडून विनापरवाना गाळप; साखर आयुक्तांनी ठोठावला पाच कोटींचा दंड
- येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर; नगरसुलला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढल्या
- ठाण्यात एकाच वेळी १ हजार नागरिकांचे आधारकार्ड बनणार; राज्यातील सर्वात मोठे आधार केंद्र साकारले
- Punjab Election : नेहरूंना जबाबदार ठरवत, “हे” स्वतःचे गुन्हे लपवताहेत; डॉ. मनमोहन सिंगांचा मोदींवर थेट हल्लाबोल!!
- सामान्य पार्श्वभूमी असूनही योग्याप्रमाणे इच्छाशक्तीमुळे नरेंद्र मोदी पोहोचले उच्च पदावर, ज्येष्ठ लेखक रस्किन बॉँड यांनी केले कौतुक