• Download App
    विषमतेच्या मागे तर्क उभे करून हिंदू एकमेकांपासून दुरावला, संत रोहिदासांनी अनुभूतीतून धर्म सांगितला!!; डॉ. मोहन भागवतांचे प्रतिपादन Hindus were alienated from each other by putting logic behind inequality

    विषमतेच्या मागे तर्क उभे करून हिंदू एकमेकांपासून दुरावला, संत रोहिदासांनी अनुभूतीतून धर्म सांगितला!!; डॉ. मोहन भागवतांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था

    मुंबई : विषमतेच्या मागे तर्क उभे करून हिंदू समाज एकमेकांपासून दुरावला, पण संत रोहिदासांनी आपल्या अनुभूतीतून धर्म सांगितला. तो समानतेचा धर्म आहे. तो आपण विसरता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज केले आहे. Hindus were alienated from each other by putting logic behind inequality

    संत रोहिदास समाज पंचायत संघाच्या वतीने संत रोहिदासांच्या 647 व्या जयंतीच्या निमित्ताच्या जयंती कार्यक्रमात डॉ. भागवत बोलत होते. भारतीय संतांनी सांगितलेल्या समानतेच्या मार्गाचे विवेचन त्यांनी केले. भारतीय तत्त्वज्ञानात प्रस्थानबिंदू म्हणजे ज्ञान मिळवण्याची सुरुवात आणि त्याचा निष्कर्ष म्हणजे अंतिम ज्ञान हे दोन एकच आहे. फक्त त्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. संतांनी ते मार्ग आपल्या अनुभूतीतून आणि कृतीतून समाजासाठी प्रशस्त करून ठेवले आहेत, असे डॉ. भागवत यांनी सांगितले. अस्पृश्यता नष्ट करून आपण हिंदू समाजाला मर्यादेपलीकडे समजावून सांगू शकत नाही म्हणून बाबासाहेबांनी अधर्म स्वीकारला नाही, तर बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि बुद्धांनी सांगितलेले अंतिम तत्व स्वीकारले. म्हणजेच त्यांनी पुन्हा भारतीय तत्त्वज्ञानच स्वीकारले, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

     

    संत रोहिदासांनी सांगितले, की आपले कर्म करा. धर्माला अनुसरून कर्म करा. संपूर्ण समाज जोडा. समाजाच्या उन्नतीसाठी काम करणे हाच खरा धर्म आहे. फक्त स्वतःविषयी विचार करून स्वतःचे पोट भरणे म्हणजे धर्म नव्हे, हे संत रोहिदासांनी आणि त्यांच्या समकालीन संतांनी आपल्या कृतीतून आणि अनुभूतीतून सांगितले. त्यामुळे बडे – बडे लोक संत रोहिदासांचे भक्त बनले होते, याची आठवण डॉ. मोहन भागवत यांनी संत मीराबाईंच्या उदाहरणातून सांगितली.

    संतांनी आपल्या अनुभूतीतून आणि कृतीतून समाजाला समता शिकवली. पण त्या वेळचे ब्राह्मण वेगवेगळे तर्क लढवून विषमतेचे समर्थन करत राहिले. हे सर्व जण संत रोहिदासांपुढे तर्कात देखील हरायचे. कारण संत रोहिदासांकडे रोकडी अनुभूती होती, तर विषमतेचे तर्क देणाऱ्यांकडे फक्त शास्त्रार्थाचे कागद होते, असे मोहन भागवत म्हणाले.

    Hindus were alienated from each other by putting logic behind inequality

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!