प्रवीण पोटे अमरावती सिटी पोलीसांसमोर शरण; करुन घेतली अटकHindus only showed sticks, did not hit sticks, if they hit sticks, the whole of Hindustan will burn; BJP MLA Praveen Pote’s statement at the time of arrest
प्रतिनिधी
अमरावती : त्रिपुरा येथे कथित हिंसेच्या निषेधार्थ गेल्या शुक्रवारी रझा अकादमीने पुकारलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागल्यानंतर त्याचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपाने शनिवारी पुकारलेल्या बंद दरम्यान पुन्हा जाळपोळ, हिंसाचार झाला.
अमरावतीत सध्या तणावपूर्ण शांतता असून कर्फ्यू लावण्यात आला आहे. शहरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी माजी राज्यमंत्री आणि भाजपा आमदार प्रवीण पोटे यांना अटक केली आहे.
प्रवीण पोटे हे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले. अटक करून घेण्यापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केले आहे. हिंदूंनी आता फक्त काडी दाखविली आहे. काडी मारलेली नाही. हिंदूंनी काडी मारली तर अख्खा हिंदुस्तान पेटल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले आहेत त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही त्यांनी इशारा दिला आहे. हिंदूंना चिरडू नका नाहीतर तुमचे आम्ही काही ठेवणार नाही, असे ते म्हणाले आहेत.
अमरावतीमधील हिंसाचारामागे भाजपा असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. पोलिसांनीही याप्रकरणी अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. भाजपाचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनाही अटक करण्यात आली होती.
दरम्यान प्रवीण पोटे यांनीच १३ नोव्हेंबरला अमरावती बंदचं आवाहन केलं होतं. यानंतर आज प्रवीण पोटे यांनी अमरावती सिटी पोलीसांसमोर आत्मसमर्पण करत अटक करुन घेतली. त्यांच्यासह एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे.
आत्मसमर्पण करण्यापूर्वी प्रवीण पोटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमरावती शहरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने अमरावती शहरात काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण केली आहे.
हिंदू आपण पेटलेला पाहत आहोत. हिंदूंनी फक्त काडी दाखवली आहे, काडी मारलेली नाही. काडी मारली तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांगतो की हिंदूंना चिरडू नये अन्यथा तुमचे आम्ही काहीही ठेवणार नाही”.
हिंदूंच्या घरत गेलो तर त्यांच्या घरी साप मारायला काडीदेखील सापडत नाही. पण त्या दिवशी सगळे हिंदू, व्यापारी स्वत: रस्त्यावर उतरले होते. अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच इतका जबरदस्त बंद पहायला मिळाला. रझा अकादमीवर बंधनं घातलं नाही तर ते असंच सुरु राहणार,” असंही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
Hindus only showed sticks, did not hit sticks, if they hit sticks, the whole of Hindustan will burn; BJP MLA Praveen Pote’s statement at the time of arrest
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी