• Download App
    अभिनेत्रीला ऑनलाईन साडी खरेदी करने पडल महागात Hindi serial Actress cheated unknown cyber accused to buy Online Saree purchase

    अभिनेत्रीला ऑनलाईन साडी खरेदी करने पडल महागात

    हिंदी सिरीयलच्या एका अभिनेत्रीला ऑनलाइन साडी खरेदी करणे चांगलेच महागात पडले असून, साडी छान वाटल्याने त्यांनी ऑनलाइन खरेदी केली. मात्र, सायबर चोरट्यांनी ३४ हजार रुपयांना तिला गंडा घातला आहे.


    विशेष प्रतिनिधी 

    पुणे -हिंदी सिरीयलच्या एका अभिनेत्रीला ऑनलाइन साडी खरेदी करणे चांगलेच महागात पडले असून, साडी छान वाटल्याने त्यांनी ऑनलाइन खरेदी केली. साडीचे पार्सल आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष साडी पाहिल्यानंतर त्यांना ती खराब वाटली. त्यामुळे त्यांनी परत देऊन पैसे रिफन्ड मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यावरून 34 हजार ट्रान्सफरकरून फसवणूक केली आहे. Hindi serial Actress cheated unknown cyber accused to buy Online Saree purchase

    याप्रकरणी 45 वर्षीय अभिनेत्रीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईल धारक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या हिंदी सिरीयलमधील अभिनेत्री आहेत. त्यांनी हिंदी मालिकांत काम केले आहे. त्या पुण्यातील कल्याणीनगर भागात राहण्यास आहेत. त्यांना ऑनलाइन सर्च करताना डब्ल्युओडब्ल्यु कलेक्शन या पेजवर साडीची जाहिरात दिसली. त्यांनी साडी छान वाटल्याने ऑर्डर केली. साडीची ऑर्डर आल्यानंतर त्यांनी साडी पाहिली.



    परंतु, साडी प्रत्यक्षात पाहता तिची कॅलिटी खराब वाटली. त्यामुळे त्यांनी पेजवर असणार्‍या ग्राहक क्रमांकावर संपर्क केला आणि पैसे रिफन्ड करण्याबाबत सांगितले. त्यानंतर त्यांना संबंधित कस्टमर केअर व्यक्तीने एक लिंक पाठवली व त्यात माहिती भरण्यास सांगितले. नाव आणि पेटीएमची त्यांनी माहिती भरली. त्यात त्यानी ओटीपी देखील दिला. पण, काही क्षणात त्यांच्या ओटीपी देखील दिल्याचे लक्षात आले.

    त्यांनी लागलीच खात्यामधून पैसे काढून घेतले. बँकेत जाऊन खात्री केली. त्यावेळी बँक खाते सुरक्षित असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पतीला खात्यावर पैसे टाकण्यास सांगितले. त्यांनी खात्यात पैसे टाकल्यानंतर अज्ञाताने त्यांच्या खात्यामधून 34 हजार रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

    Hindi serial Actress cheated unknown cyber accused to buy Online Saree purchase

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस