• Download App
    मालेगावात आज हिजाब दिन; बुलढाण्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 144 कलम!! Hijab day in Malegaon today

    मालेगावात आज हिजाब दिन; बुलढाण्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 144 कलम!!

    प्रतिनिधी

    मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे संपूर्ण देशात पडसाद उमटले असताना मालेगावात आज हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. काल तेथे हजारो महिलांनी हिजाब परिधान करून निदर्शने केली. मोर्चा काढला. जालन्यातही हिजाब प्रकरणाचे पडसाद उमटले असून हजारो मुस्लिम महिलांनी काल रस्त्यावर येऊन निदर्शने केली. कर्नाटक सरकारचा निषेध केला. बुलढाण्यात अशाच प्रकारचा मोर्चा निघून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने शहरात 144 कलम लागू करण्यात आले आहेHijab day in Malegaon today

    मौलाना मुक्ती इस्माईल यांनी मालेगावातील सर्व मौलानांची बैठक घेऊन शुक्रवारी महिलांना हिजाब दिन पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे आज घराबाहेर पडताना मालेगावात सर्व महिला हिजाब परिधान करून बाहेर पडणार आहेत. हिजाब परिधान करणे हा मुस्लिम महिलांचा हक्क आहे. तो इबादतसाठी आवश्यक आहे. मुस्लिम महिलांवर कोणीही पोशाखाची सक्ती करू शकत नाही, असे मौलाना मुक्ती इस्माईल त्यांनी सांगितले.

    बुलढाण्यात आज मोर्चा आणि निदर्शनांसाठी मोठ्या प्रमाणावर जमा जमण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तेथे 144 कलम अर्थात संचारबंदी लागू केली आहे. दुसऱ्या राज्यात एखादी घटना घडत असेल तर त्यावरून महाराष्ट्रात कोणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करु नये, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील केले यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात 144 कलम लागू करून लागू करण्यात आले आहे.

    Hijab day in Malegaon today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!